अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं! पुण्यात झालेल्या कार्यक्रमातील प्रकार, खुर्ची केली दूर
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं! पुण्यात झालेल्या कार्यक्रमातील प्रकार, खुर्ची केली दूर

अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं! पुण्यात झालेल्या कार्यक्रमातील प्रकार, खुर्ची केली दूर

Jan 24, 2025 11:32 AM IST

Sharad pawar and Ajit Pawar : पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार दोघेही एकत्र आले होते. या कार्यक्रमात दोघांनी एकमेकांजवळ बसणे टाळल्याचे दिसले.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं! पुण्यातील कार्यक्रमातील प्रकार, खुर्ची केली दूर
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं! पुण्यातील कार्यक्रमातील प्रकार, खुर्ची केली दूर (HT_PRINT)

Vasantdada Sugar Institute Program : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद काँग्रे शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे दोघेही काका पुतण्या पुन्हा एकदा एकाच मंचावर दिसले. पुण्यात गुरुवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात हे दोघेही एकत्र आले होते. या कार्यक्रमात दोघांची बैठक व्यवस्था जवळजवळ करण्यात आली होती. मात्र, अजित पवार यांनी शरद पवार यांच्या जवळ बसने टाळले.

गुरुवारी पुण्यात माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी आयोजित केलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) बैठकीसाठी हे दोघे पुण्यात एकत्र आले होते. दिलीप वळसे पाटील हे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. तर शरद पवार हे व्हीएसआयचे अध्यक्ष आहेत, तर वळसे पाटील उपाध्यक्ष आहेत.

या कार्यक्रमात आयोजकांनी शरद पवारांच्या शेजारी उजव्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवारांची बसण्याची व्यवस्था केली होती. पण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं. आयोजकांनी केलेली बैठक व्यवस्था अजित पवारांनी ऐनवेळी बदलून शरद पवार आणि त्यांच्यामध्ये राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना बसायला लावलं. तसेच नावाची पाटी देखील त्यांनी बदलून घेतली.

या बाबत अजित पवार म्हणाले की, मी फक्त बाबासाहेब पाटील यांचा आदर केला. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना शरद पवार यांच्याशी बोलायचे होते. शरद पवारांशी मी केव्हाही बोलू शकतो, म्हणून मी बाबासाहेबांना मध्येच बसू दिलं. आमच्या खुर्च्या जवळ असल्याने मी त्या दोघांशी बोलू शकत होतो. बाबासाहेबांना सहकारमंत्री होण्याची संधी पहिल्यांदा मिळाली, म्हणून मी त्यांना तो सन्मान दिला. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पक्षाचे आठ खासदार आणि दहा आमदारांसह शरद पवार स्वत: महायुतीत प्रवेश करू शकतात, अशीही चर्चा आहे. दरम्यान शरद पवारांनी अजित पवारांनी बक्षिसाची रक्कम वाढवण्याची सूचना लगेच मान्य केली.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शरद पवार हे अध्यक्ष आहेत. तर दिलीप वळसे पाटील हे उपाध्यक्ष आहेत. तर इतर सर्वपक्षीय नेते विश्वस्त आहेत. राजकारण बाजूला ठेऊन वर्षानुवर्षे या संस्थेचं काम या नेत्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार व शरद पवार हे एकत्र येणं टाळत आहे. तब्बल दीड वर्षानंतर पहिल्यांदा दोघेही व्हीएसआयमध्ये गुरुवारी एकत्र आले होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर