दहा वर्षांनी पाळणा हलला, बारशावरुन पुण्याला येतांना कुटुंबावर काळाचा घाला; मद्यधुंद तरुणांच्या स्कॉर्पिओच्या धडकेत ४ ठार-scorpio hit on car 4 died including baby boy and mother 2 crictically injured chhatrapati sambhaji nagar accident ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  दहा वर्षांनी पाळणा हलला, बारशावरुन पुण्याला येतांना कुटुंबावर काळाचा घाला; मद्यधुंद तरुणांच्या स्कॉर्पिओच्या धडकेत ४ ठार

दहा वर्षांनी पाळणा हलला, बारशावरुन पुण्याला येतांना कुटुंबावर काळाचा घाला; मद्यधुंद तरुणांच्या स्कॉर्पिओच्या धडकेत ४ ठार

Sep 14, 2024 10:09 AM IST

Sambhaji Nagar accident : छत्रपती सांभाजीनगर येथे मनहेलवणारी घटना उघडकीस आली आहे. एका अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे.

संभाजीनगरमध्ये भीषण अपघात!बाळाचं बारसं आटोपून पुण्याला येत असतांना मद्यधुंद तरुणांच्या गाडीची धडक; चौघे जागीच ठार
संभाजीनगरमध्ये भीषण अपघात!बाळाचं बारसं आटोपून पुण्याला येत असतांना मद्यधुंद तरुणांच्या गाडीची धडक; चौघे जागीच ठार

Sambhaji Nagar accident : संभाजी नगर येथे ड्रंक अँड ड्राईव्हची घटना उघडकीस आली आहे. दहा वर्षानंतर झालेल्या बाळाचे बारसे आटोपून पुण्याला येत असणाऱ्या एका कुटुंबाच्या कारला मद्यधुंद अवस्थेत स्कॉर्पिओ कार चालवत धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या घटतेत कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या नगर रोडवरील लिंबे जळगाव परिसरातील टोलनाक्याजवळ मध्यरात्री घडली. मद्यधुंद तरुण चालकांना अटक करण्यात आली आहे.

मृणालिनी अजय बेसरकर (वय ३८), आशालता हरिहर पोपळघट (वय ६५), अमोघ बेसरकर (६ महिने), दुर्गा सागर गीते (वय ७) अशी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर अजय अंबादास बेसरकर (वय ४०), शुभांगिनी सागर गीते (वय ३५) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत . तर विशाल चव्हाण व कृष्णा केरे असे आपघतास कारणीभूत ठरलेल्या आरोपींची नावे आहेत. विशाल चव्हाणने कृष्णा केरे याच्या कडे वाहन चालवण्याचा परवाना नसतांना देखील गाडी चालवण्यास दिली. ऐवढेच नाही तर केरे व चव्हाण हे दोघे दारू पिऊन गाडी चालवत होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमरावती येथील अजय देसरकर हे संभाजी नगर येथील बारसे आटपून कुटुंबासह पुण्याला येत होते. यावेळी दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या चव्हाण व केरे यांच्या स्कॉर्पिओने देसरकर यांच्या कारला जोरदार धडक दिली. ही घटना संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या नगर रोडवरील लिंबे जळगाव येथे घडली.

ही स्कॉर्पिओ दुभाजक ओलांडून पलीकडे जाऊन कारला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की बाळासह आई आणि आजीचा जागीच मृत्यू झाला. एकाचा कुटुंबातील तिघांच्या मृत्यूने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. कार कृष्णाच्या नावावर असून त्याने विशालला मद्यधुंद असताना व वाहन चालवण्याचा परवाना नसतांना देखील गाडी चालवण्यास दिल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Whats_app_banner