Latur: लातूर येथील शिक्षकानं उचललं टोकाचं पाऊल; पत्नी आणि मुलीसह मालगाडीसमोर घेतली उडी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Latur: लातूर येथील शिक्षकानं उचललं टोकाचं पाऊल; पत्नी आणि मुलीसह मालगाडीसमोर घेतली उडी

Latur: लातूर येथील शिक्षकानं उचललं टोकाचं पाऊल; पत्नी आणि मुलीसह मालगाडीसमोर घेतली उडी

Nov 29, 2024 10:52 PM IST

Latur teacher Sucide With Family: लातूर येथील एका शिक्षकाने पत्नी आणि मुलीसह मालगाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या केली.

लातूरमध्ये एका शिक्षकाची पत्नी आणि मुलीसह मालगाडीसमोर उडी
लातूरमध्ये एका शिक्षकाची पत्नी आणि मुलीसह मालगाडीसमोर उडी (freepik)

Latur Family Suicide News: लातूर येथून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली. एका शिक्षकाने आपली पत्नी आणि मुलगी यांच्यासह मालगाडीसमोर उडी घेतली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून गुरुवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोकाकूळ वातावरण आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मसानाजी तुडमे (वय ५३), त्यांची पत्नी रंजना तुडमे आणि मुलगी अंजली तुडमे (वय,२२) अशी मृतांशी नावे आहेत. हे सर्वजण अहमदपूर तालुक्यातील किणी कडू येथे वास्तव्यास होते. मसानाजी तुडमे हे गंगाखेड येथील ममता माध्यमिक शाळेत शिक्षक होते.

दरम्यान, मसानाजी तुडमे यांनी पत्नी आणि मुलीसह गुरुवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास गंगाखेड शहराजवळील धारखेड येथील गोदावरी नदीवरील पुलाजवळ धावत्या मालगाडीसमोर उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. या तिघांवर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या तिघांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु, तुडमे यांच्या जावयाचा गेल्या वर्षी अपघातात मृत्यू झाला, तेव्हापासून ते नैराश्यात होते, अशी माहिती काही ग्रामस्थानी दिली.

आत्महत्या करणे कायद्याने गुन्हा

भारतात आत्महत्या करणे किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणे कायद्याने गुन्हा आहे. अनेकदा लोक मानसिक तणावातून आत्महत्येचा निर्णय घेतात. मात्र, आत्महत्या कोणत्याही समस्येचे निवारण ठरू शकत नाही. यामुळे कोणतीही समस्या किंवा अडचण असेल तर, सर्वात प्रथम आत्महत्येचा विचार आपल्या डोक्यातून काढून टाका. तसेच समस्यावर कसा तोडगा काढता येईल? याकडे लक्ष द्या. याशिवाय, आपल्याकडून नकळत कोणतीही चूक झाली असेल तर, घाबरू नका. घरातील मोठ्या आणि जवळच्या व्यक्तींसमोर मन मोकळे करा, ते नक्कीच तुमची मदत करतील.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर