Mumbai: मुंबईतील शाळा बॉम्बनं उडवण्याची धमकी, अफझल टोळीचा ईमेल, पोलीस अलर्ट!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai: मुंबईतील शाळा बॉम्बनं उडवण्याची धमकी, अफझल टोळीचा ईमेल, पोलीस अलर्ट!

Mumbai: मुंबईतील शाळा बॉम्बनं उडवण्याची धमकी, अफझल टोळीचा ईमेल, पोलीस अलर्ट!

Jan 23, 2025 04:35 PM IST

Mumbai School Bomb Threat Today: मुंबईतील जोगेश्वरी- ओशिवरा आणि नवी मुंबईतील शाळेला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.

मुंबईतील शाळा बॉम्बनं उडवण्याची धमकी
मुंबईतील शाळा बॉम्बनं उडवण्याची धमकी

Mumbai School Bomb Threat News: मुंबईतील जोगेश्वरी आणि ओशिवरा भागातील एका शाळेत बॉम्बच्या धमकीचा ईमेल आल्यानंतर खळबळ उडाली. धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलीस आणि बॉम्ब स्क्वॉडची टीम शाळेच्या परिसरात पोहोचली आणि तपास सुरू केला. ईमेलमध्ये अफझल गँगने बॉम्ब ठेवल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलीस संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. याशिवाय, नवी मुंबईतील एका खाजगी शाळेलाही असाच धमकीचा ईमेल आला आहे, अशीही माहिती समोर येत आहे.

मुंबईतील जोगेश्वरी-ओशिवरा भागातील एका शाळेला बॉम्ब स्फोटाची धमकी देणारा गुरुवारी सकाळी ईमेल आला. मुंबई पोलिसांनी सांगितले की, बॉम्बशोधक पथकासह स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अधिकारी आता परिसराची कसून चौकशी करत आहेत. अफझल टोळीने शाळेच्या आवारात बॉम्ब ठेवल्याचा उल्लेख या ईमेलमध्ये करण्यात आला आहे.

या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या दोन्ही घटनांमुळे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाले आहेत. पोलिस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. तसेच धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी शाळा प्रशासन आणि पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

 

देशाच्या विविध भागांतील शाळांसाठी बॉम्बस्फोटाच्या धमक्या ही वारंवार येणारी समस्या बनली आहे. बहुतेक प्रकरणे फसवी ठरले आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला तामिळनाडूतील इरोडजवळील दोन उच्च माध्यमिक शाळांनाही धमकीचे ई-मेल आले होते, ज्यात शाळेच्या आवारात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर शाळा प्रशासनाने ताबडतोब विद्यार्थ्यांना घरी पाठवून पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेले पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाने परिसरात तपासणी केली असता काहीही संशयास्पद न सापडल्याने ही धमकी फसवी असल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी राष्ट्रीय राजधानीतील ४०० हून अधिक शाळांना बॉम्बने उडवून देणाऱ्या धमकीच्या मालिकेवर ही कारवाई केली आहे. अलीकडेच या धमकीच्या ईमेलसाठी जबाबदार असलेल्या एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर