पुण्यात ज्येष्ठ नागरिकाचं गैरकृत्य! सात वर्षाच्या चिमुरडीला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार; पोलिसांनी केली अटक-school girl molested by senior citizen by threatening to kill her in pune sahakar nagar ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यात ज्येष्ठ नागरिकाचं गैरकृत्य! सात वर्षाच्या चिमुरडीला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार; पोलिसांनी केली अटक

पुण्यात ज्येष्ठ नागरिकाचं गैरकृत्य! सात वर्षाच्या चिमुरडीला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार; पोलिसांनी केली अटक

Sep 14, 2024 05:46 AM IST

Pune sahakarnagar Crime : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका ७८ वर्षीय वृद्ध व्यक्तीने अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला. आरोपी वृद्धाला अटक करण्यात आली आहे.

पुण्यात ज्येष्ठ नागरिकाचं गैरकृत्य! सात वर्षाच्या चिमुरडीला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार; पोलिसांनी केली अटक
पुण्यात ज्येष्ठ नागरिकाचं गैरकृत्य! सात वर्षाच्या चिमुरडीला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार; पोलिसांनी केली अटक

Pune sahakarnagar Crime : पुण्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. बदलापूर येथील घटना ताजी असतांना पुण्यात सहकार नगर येथे देखील एका अल्पवयीन मुलीला ७८ वर्षीय वृद्ध व्यक्तीने चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी वृद्ध व्यक्तिला अटक करण्यात आली आहे. मुलीने ही घटना आजीला संगील्यावर या प्रकरणाचा खुलासा झाला.

पुण्यातील सहकार नगर येथील बालाजी नगरमध्ये हा प्रकार घडला. मधुकर पीराजी थिटे (वय ७८) असे वृद्ध आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आजीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित ७ वर्षांची मुलगी ही आरोपी थिटे याच्या घरा शेजारी राहायला आहे. मुलीला पोटात दुखू लागल्यावर तिने तिच्यावर बेतलेला प्रसंग आजीला सांगितला. यामुळे आजी हादरली. तिला दवाखान्यात नेऊन पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी मधुकर थिटेने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं. मुलीची प्रकृतीस्थिर असून अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करून आरोपी मधुकर थिटेला अटक करण्यात आली आहे

काय आहे प्रकरण?

आरोपी मधुकर पिराजी थिटे (वय ७८, रा. धनकवडी) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकाने पीडित मुलीला खाऊ देण्याच्या आमिषाने घरी नेले. यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने आरडाओरडा केला. यावेळी त्याने मुलीच्या गळ्याला चाकू लावत तिला धमकावत जीवे मारण्याची धमकी दिली.

पीडित मुलीने तिच्यावर झालेला अत्याचार तिच्या आजीला सांगितला. यानंतर त्यांनी सहकार नगर पोलिस ठाणे गाठत या प्रकरणी तक्रार दिली. त्यानुसार पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सहायक पोलीस आयुक्त नंदिनी वग्यानी-पराजे पुढील तपास करत आहेत.

Whats_app_banner
विभाग