Mumbai News : शिक्षण हा कायद्याने हक्क असतांना केवळ १००० रुपयांची फी भरली नाही म्हणून एका ५ वर्षांच्या मुलाला शाळेत डांबून ठेवण्यात आल्याचा प्रकार नवी मुंबई येथील एका शाळेत घडला आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी शाळा प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुलाच्या पालकाने शाळेची फी पूर्ण भरल्याची माहिती आहे.
नवी मुंबईतील सिवूड येथील ओर्चीड इंटरनॅशनल शाळेत ही घटना घडली. मुलाच्या पालकांनी शाळेची पूर्ण फी भरली असताना देखील शाळेच्या तांत्रिक चुकीमुळे ती भरली नसल्याचे कारण पुढे करत पाच वर्षांच्या चिमुकल्या विद्यार्थ्याला तब्बल ४ तास शाळेतील डे केअर सेंटर मध्ये डांबून ठेवल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी पालकांनी शाळा प्रशासनाला जाब विचारत थेट शाळे विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार डिओई आहे. पोलिसांनी पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार ओर्चीड शाळेच्या मुख्याध्यापिका व महिला कोऑर्डीनेटर विरोधात मुलाला क्रूरतेची वागणूक दिल्या प्रकरणी गुन्हा केला आहे.
नवी मुंबईत सिवूड येथील ओर्चीड इंटरनॅशनल शाळेत एका मुलाच्या पालकांनी फी भरली नाही म्हणून त्याला तब्बल ४ तास त्याला शाळेत डे केअरमध्ये डांबून ठेवले होते. पालकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर शाळेतील दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आहे. पोलिसांनी गुरुवारी एनआरआय सागर पोलिस ठाण्यात बाल न्याय कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पालकांच्या तक्रारीनुसार त्यांच्या ५ वर्षांच्या मुलाला २८ जानेवारी रोजी शाळेच्या आवारात डे केअरमध्ये डांबून ठेवण्यात आले होते. तब्बल चार तास मुलाला शाळेत ठेवण्यात आले होते. पालकांनी मुलगा का आला नाही म्हणून शाळेत चौकशी केली. यावेळी त्यांनी फी न भरल्यामुळे मुलाला शाळेत ठेवल्याचं उत्तर दिले. मात्र, पालकांनी त्याच्या शाळेची फी ही भरली होती. ही बाब त्यांनी शाळा व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिली होती. या प्रकरणी चौकशीनंतर कारवाईचे आश्वासन शाळा प्रशासनाने दिली होती. मात्र, मुख्याध्यापक व समन्वयकांना क्लीन चिट देण्यात आली होती. त्यामुळे पालकांनी थेट पोलिसांत धाव घेत या प्रकरणी गुन्हा दाखल केला.
संबंधित बातम्या