धक्कादायक.. शाळेतील लिपिकाचा विद्यार्थिनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, विरोध करताच पाजलं किटकनाशक; उपचारादरम्यान मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  धक्कादायक.. शाळेतील लिपिकाचा विद्यार्थिनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, विरोध करताच पाजलं किटकनाशक; उपचारादरम्यान मृत्यू

धक्कादायक.. शाळेतील लिपिकाचा विद्यार्थिनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, विरोध करताच पाजलं किटकनाशक; उपचारादरम्यान मृत्यू

Jul 31, 2024 06:00 PM IST

Pune Crime : इंदापूर तालुक्यात एका लिपिकाने नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने विरोध केल्यानंतर तिला जबरदस्तीने कीटकनाशक पाजलं गेलं.

शाळेतील लिपिकाचा विद्यार्थिनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
शाळेतील लिपिकाचा विद्यार्थिनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

पुणे जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.  इंदापूर तालुक्यात एका लिपिकाने नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने विरोध केल्यानंतर तिला जबरदस्तीने कीटकनाशक पाजलं गेलं. यात पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. लिपिकाने रविवारी मुलीला कीटकनाशक पाजलं होतं. चार दिवसानंतर मुलीची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. एकतर्फी प्रेमातून उरणमध्ये तरुणीची निघृण हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतील कारकूनाने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. मुलगी नववीत शिकत होती. आरोपीने मुलीवर पाळत ठेवत थेट तिच्या घरी जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर कारकूनाने केला होता. संबंधित मुलीने या कारकूनास प्रतिकार केल्याने आरोपीने तिला कीटकनाशक पाजून तिच्यावर बळजबरी केली होती. २८ जुलै रोजी इंदापूर तालुक्यात ही घटना घडली होती.

गंभीर अवस्थेत मुलीला अकलूज येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर आज उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूमुळे इंदापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. रणजित जाधव असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मुलीच्या मृत्यूनंतर आरोपीविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. पीडितेने मृत्यूआधी दिलेल्या जबाबात दिलेल्या माहितीनुसार आरोपीने घरी येऊन बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. अंगाशी लगट करताना पीडितेने प्रतिकार केला. यामुळे चिडलेल्या आरोपीने तिला कीटकनाशक पाजून मारण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद दाखल केली आहे.

नर्सरीतील मुलाने तिसरीच्या विद्यार्थ्यावर झाडली गोळी! -

नर्सरीत शिकणाऱ्या मुलाने त्याच्या शाळेतील तिसरीच्या विद्यार्थ्यावर गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. या मुलाने गोळीबार का केला असावा? याचा तपास पोलिस करत आहेत. घटनेनंतर शाळेचा संचालक आणि मुख्य आरोपी फरार आहेत. ही घटना बिहार राज्यातील सुपौल जिल्ह्यात घडली आहे.

या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी शाळेवर हल्ला केला. संतप्त जमावाने मुख्याध्यापक कार्यालय आणि वर्गखोल्यांची तोडफोडही केली. या घटनेत जखमी झालेला विद्यार्थ्याला दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. शाळेचा मालक संतोष कुमार याला पोलिसांनी अटक केली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर