मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bus Accident : धावत्या बसमधून डोकावणं पडलं महागात; शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Bus Accident : धावत्या बसमधून डोकावणं पडलं महागात; शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 11, 2022 12:16 PM IST

Bus Accident In Aurangpura : ड्रायव्हरनं जेव्हा बसला मागच्या दिशेनं घेतलं त्याचवेळी मुलानं बाहेर पाहण्यासाठी डोकं बाहेर काढलं, त्यानंतर हा मोठा अनर्थ घडला.

Bus Accident Aurangpura In Aurangabad
Bus Accident Aurangpura In Aurangabad (HT)

Bus Accident Aurangpura In Aurangabad : काही दिवसांपूर्वी नागपूरात एक स्कूल बस नाल्यात पडल्यानं मोठा अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच आता औरंगाबादमध्येही एका बसमधून बाहेर डोकावल्यामुळं एका शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हरिओम राधाकृष्ण पंडित असं मृत मुलाचं नाव असून या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सिटी बससह चालकाला ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादेतील औरंगपूरा भागामध्ये एक शाळकरी मुलगा सिटी बसमधून प्रवास करत होता. त्यावेळी चालकांना बस वळवण्यासाठी रिटर्न गिअर टाकला. गाडी मागे जात असताना पंधरा वर्षीय हरिओमनं बाहेर डोकावून पाहिलं, त्यावेळी त्याला रस्त्याच्या बाजूला असलेल्या गेटचा लोखंडी पोल जोरात लागला. त्यामुळं त्याच्या डोक्यात रक्तस्त्राव होऊ लागला. त्यामुळं त्याला चक्कर येऊन तो बसमधील सीटवर कोसळला. त्यानंतर त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु डोक्याला गंभीर मार लागल्यानं त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी चालकासह अपघातग्रस्त बस ताब्यात घेतली असून पुढील तपास क्रांती चौक पोलिसांकडून करण्यात येत आहे.

IPL_Entry_Point