Sawai Gandharva Mahotsav : यंदाच्या सवाई गंधर्व महोत्सवात शास्त्रीय संगीता सोबत विविध कार्यक्रमांची संगीत रसिकांना मेजवानी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sawai Gandharva Mahotsav : यंदाच्या सवाई गंधर्व महोत्सवात शास्त्रीय संगीता सोबत विविध कार्यक्रमांची संगीत रसिकांना मेजवानी

Sawai Gandharva Mahotsav : यंदाच्या सवाई गंधर्व महोत्सवात शास्त्रीय संगीता सोबत विविध कार्यक्रमांची संगीत रसिकांना मेजवानी

Published Dec 06, 2022 09:10 AM IST

Sawai Gandharva Mahotsav : आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवादरम्यान होणा-या षड्ज, अंतरंग आणि ‘शताब्दी स्मरण’ या चित्रप्रदर्शनाची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी तर सतीश पाकणीकर यांनी यंदाच्या छायाचित्र प्रदर्शनाची माहिती दिली.

 Sawai Gandharva Mahotsav
Sawai Gandharva Mahotsav

पुणे : पंडित जसराज यांच्या आठवणींना उजाळा, आलम खाँ यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम, पंडित भीमसेन जोशी यांच्यावर आधारित चित्रपटाचे प्रदर्शन...अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची मेजवाणी संगीतप्रेमींना ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवादरम्यान घेता येणार आहे. महोत्सवाचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या षड्ज, अंतरंग कार्यक्रमांतर्गत असे बहारदार कार्यक्रम आयोजिले असून, पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने महोत्सवात शताब्दी स्मरण हे प्रकाशचित्र प्रदर्शनही आयोजित केले आहे. दिवंगत ज्येष्ठ प्रकाशचित्रकार अनिल देशपांडे व सुधाकर जोशी तसेच सतीश पाकणीकर यांच्या संग्रहातील अनेक प्रकाशचित्रातून काळाच्या पडद्याआड गेलेली मैफल पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे.

आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडासंकुलात १४ ते १८ डिसेंबर दरम्यान महोत्सव आयोजित केले आहे. तर शिवाजीनगर येथील सवाई गंधर्व स्मारक येथे १४, १५ आणि १६ डिसेंबर दरम्यान सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत षड्ज व अंतरंग हे कार्यक्रम पार पडणार आहेत. शिवाय महोत्सवादरम्यान दरवर्षी आयोजित करण्यात येणारे ‘शताब्दी स्मरण’ हे प्रदर्शन देखील वैशिष्ट्यपूर्ण असेल, अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पंडितजींच्या जन्मशताब्दी निमित्ताने महोत्सवात प्रकाशचित्र प्रदर्शन आयोजिले आहे. यावर्षी हे प्रदर्शन पं. भीमसेन जोशी यांच्या प्रकाशचित्रांवर आधारित असेल. दिवंगत ज्येष्ठ प्रकाशचित्रकार अनिल देशपांडे व सुधाकर जोशी तसेच सतीश पाकणीकर यांच्या संग्रहातील अनेक प्रकाशचित्रे पाहायला मिळतील. महोत्सवाचे मुख्य आयोजक पं. भीमसेन जोशी व आपली कला सादर करायला येणारे भारतभरातील कलाकार यांच्यातील स्नेहाचे, एकमेकांच्या कलांना दाद देतानाचे, सत्काराचे, आदराचे, प्रेमाचे संबंध किती अतूट होते हे या प्रदर्शनात पाहता येईल. पंडितजी व अन्य कलाकार यांच्या प्रकाशचित्रांसह पाकणीकर यांच्या कॅमेर्‍याने टिपलेल्या ‘भीमसेनी मुद्रा’ ही या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण असेल, अशी माहिती पाकणीकर यांनी दिली.

 

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर