मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  लेझीम, ढोल-ताशे, डोंबाऱ्याचा खेळ यांनाही खेळाचा दर्जा देऊन आरक्षण द्या, दहीहंडीवरून काँग्रेसचा टोला

लेझीम, ढोल-ताशे, डोंबाऱ्याचा खेळ यांनाही खेळाचा दर्जा देऊन आरक्षण द्या, दहीहंडीवरून काँग्रेसचा टोला

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 19, 2022 07:37 PM IST

दहीहंडीला खेळा दर्जा देण्याच्या सरकारच्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसने यावरून सरकारवर निशाणा साधत लेझीम,ढोल-ताशे,डोंबाऱ्याचा खेळ अशा सगळ्यांच्याच विचार का नाही? असा सवाल केला आहे.

दहीहंडीवरून काँग्रेसचा टोला
दहीहंडीवरून काँग्रेसचा टोला

मुंबई - दहीहंडीचा क्रीडा प्रकारात समावेश करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. तसेच दहीहंडीत सहभाग नोंदवणाऱ्या गोविंदांना क्रीडा कोट्याच्या ५ टक्के आरक्षणाचा लाभही मिळेल, अशी घोषणाही शिंदे यांनी केली. यावर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी व काँग्रेसने टीकेची झोड उठवली आहे.

पण याच घोषणेवरून वादंग सुरू होताना दिसत आहे.  मुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्णयाविरुद्ध परीक्षार्थी संघटना आक्रमक होत असून त्यांनी या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला आहे. काँग्रेसचे युवा नेते सत्यजीत तांबे (Satyajit tambe) यांनी सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. तांबे यांनी ट्विट केले आहे की, गोविंदांना सरकारी नोकरी देण्याबद्दलकाहीही आक्षेप नाही पण मग लेझीम, ढोल-ताशे, डोंबाऱ्याचा खेळ अशा सगळ्यांच्याच विचार का नाही? देशात व राज्यात बेरोजगारी वाढत असताना केवळ राजकीय हेतूने अशा प्रकारच्या पोरकट घोषणा म्हणजे तमाम युवा पिढीची केलेली चेष्टाच आहे.

MPSC समन्वय समिती महाराष्ट्र राज्य या परीक्षार्थ्यांच्या संघटनेने यासंदर्भात एक ट्विट करून निर्णयाचा विरोध केला आहे.

समाज अधोगतीकडे नेण्याचे मूर्तीमंत उदाहरण. दहीहंडीमधील गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण देऊन, सरकारची आमच्याकडून काय अपेक्षा आहे? आम्ही सुद्धा लायब्ररी सोडून भगवे झेंडे घेत दहीहंड्या फोडत फिरायचे?आज वाटत आहे राज्यातील करोडो सुजाण नागरिकांनी कोणाला खुर्चीवर बसवले आहे. असे ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांना टॅग करण्यात आले आहे.

IPL_Entry_Point