Satish Wagh Case : भाजप आमदाराचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणात खळबळजनक खुलासा, प्रेमप्रकरणातून पत्नीनेच दिली सुपारी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Satish Wagh Case : भाजप आमदाराचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणात खळबळजनक खुलासा, प्रेमप्रकरणातून पत्नीनेच दिली सुपारी

Satish Wagh Case : भाजप आमदाराचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणात खळबळजनक खुलासा, प्रेमप्रकरणातून पत्नीनेच दिली सुपारी

Dec 25, 2024 09:59 PM IST

Satish Wagh Murder Case : सतीश वाघ हत्येप्रकरणीत्यांच्याच पत्नीला अटक करण्यात आली आहे. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत मोहिनी वाघ यांचे प्रेम प्रकरण होतं. यामध्ये सतीश वाघ अडथळा ठरत असल्याने मोहिनीने त्यांना संपवण्याचा निर्णय़ घेतला.

सतीश वाघ हत्या प्रकरण
सतीश वाघ हत्या प्रकरण

Satish Wagh Murder Case : पुण्यातील भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येबाबत खळबळजनक माहिती समोर आली आहे. सतीश वाघ यांची हत्या करणारा व्यक्ती त्यांच्या शेजारचा असल्याची आधी चर्चा होती, मात्र त्यांच्या हत्येची सुपारी त्यांची पत्नी मोहिनी वाघ यांनीच दिल्याचे तपासात समोर आले आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्य़ा केल्याचे समोर येत आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने याप्रकरणी सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी हिला अटक केली आहे.

सतीश वाघ हत्येप्रकरणी त्यांच्याच पत्नीला अटक करण्यात आली आहे. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत मोहिनी वाघ यांचे प्रेम प्रकरण होतं. यामध्ये सतीश वाघ अडथळा ठरत असल्याने मोहिनीने त्यांना संपवण्याचा निर्णय़ घेतला. याबाबतची कबुली मोहिनी वाघ यांनी पोलिसांकडे दिली आहे. 

सतीश वाघ हत्या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत पाच जणांना अटक करण्य़ात आली आहे. मोहिनीने आपल्या पतीच्या हत्येची सुपारी अक्षय जवळकर याला दिली होती. पोलिसांनी या प्रकरणी पवनकुमार शर्मा, विकास शिंदे, अतिश जाधव आणि अक्षय जवळकर यांना याआधीच अटक केली आहे.

वाघ यांच्या हत्या प्रकरणात त्यांची पत्नीच मास्टरमाइंड निघाली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या गुन्ह्याची उकल केली आहे. सतीश वाघ यांच्या हत्येचा मुख्य आरोपी त्यांची पत्नीच निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

९ डिसेंबर रोजी हत्या -

सतीश वाघ हे पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक होते. ९ डिसेंबरला पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले असताना शेवरोले गाडीतून आलेल्या चार जणांनी त्यांचे अपहरण करून हत्या केली होती. ब्ल्यू बेरी हॉटेलच्या समोरून त्यांचे अपहरण केलं होतं. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु असतानाच त्याच दिवशी रात्री एका ठिकाणी घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला होता. अपहरणानंतर त्याच गाडीत चाकूने भोसकून त्य़ांची हत्या केली होती, त्यांच्या शरीरावर ७२  वेळा वार केल्याचे समोर आले होते. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर