भल्याभल्यांना बिनधास्त भिडणारे सतेज पाटील लहान मुलासारखे रडले! कोल्हापुरातील उमेदवाराची माघार जिव्हारी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  भल्याभल्यांना बिनधास्त भिडणारे सतेज पाटील लहान मुलासारखे रडले! कोल्हापुरातील उमेदवाराची माघार जिव्हारी

भल्याभल्यांना बिनधास्त भिडणारे सतेज पाटील लहान मुलासारखे रडले! कोल्हापुरातील उमेदवाराची माघार जिव्हारी

Nov 05, 2024 11:31 AM IST

Kolhapur North Constituency Politics : उत्तर कोल्हापुरात अर्ज माघारीच्या दिवशी अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेसने मधुरिमाराजे यांना उमेदवारी दिली. मात्र, त्यांनी अचानक माघार घेतल्याने काँग्रेससह सतेज पाटील यांना जबर धक्का बसला.

भल्याभल्यांना बिनधास्त भिडणारे सतेज पाटील लहान मुलासारखे रडले! कोल्हापुरातील उमेदवाराची माघार जिव्हारी
भल्याभल्यांना बिनधास्त भिडणारे सतेज पाटील लहान मुलासारखे रडले! कोल्हापुरातील उमेदवाराची माघार जिव्हारी

Kolhapur North Constituency Politics : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या लढतीचे चित्र स्पष्ट झालं आहे. सोमवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. या दिवशी उत्तर कोल्हापुरात मात्र, अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेसने उमेदवारी दिलेल्या मधुरीमा राजे यांनी अचानक निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने सतेज पाटील यांचा राग अनावर झाला होता. निवडणूक लढवाची नव्हती तर उमेदवारी कशाला घेतली म्हणत सतेज पाटील चांगलेच संतापले होते. रात्री या घटनेबद्दल कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना मात्र, भल्या भल्यांना भिडणारे सतेज पाटील भावुक झालेले दिसले. आपली बाजू मांडतांना सतेज पाटील हे एका लहान मुलासारखे ढसाढसा रडतांना दिसले. यावेळी, इतर कार्यकर्त्यांनी त्यांची समजूत काढली.

सतेज पाटील हे काँग्रेसचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत. विविध मुद्यावरून अनेकांना भिडणारे सतेज पाटील उत्तर कोल्हापूर मतदार संघातील राजकीय नाट्यवरून चांगलेच भावुक झालेले दिसले. ते हताश झाले होते. मधूरिमा राजे यांनी उत्तर कोल्हापूर मतदार संघातून माघार घेतल्याने आता या मतदार संघात काँग्रेसचा उमेदवारच राहिला नाही. दरम्यान, रात्री सतेज पाटील यांनी अजिंक्यतारा येथील कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते बोलण्यासाठी उभे राहिले असता त्यांना गहिवरून आलं. त्यांना बोलताना कोसळलं. सतेज पाटील म्हणाले, मी माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नाही. दरम्यान, पुढे बोलतांना त्यांना शब्द फुटत नव्हता. ते अचानक रडायला लागले आणि खाली बसले. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी सतेज पाटील यांची समजूत काढण्याचा देखील प्रयत्न केला.

सतेज पाटील म्हणाले, काल दुपारपासून मी कुणाशी भेटू शकलो नव्हतो. मला २ वाजून ३६ मिनीटांनी मालोजीराजेंचा फोन आला. त्यांनी सांगितलं की, माघार घेणार आहे. मात्र, यावेळी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न कार माघार घेऊ नका असे म्हटले. पक्षाने माझ्याकडे बघून एक उमेदवारी बदलून दुसरी उमेदवार दिला आहे. कोणतेही संकट आलं तरी उमेदवारी मागे घेऊ नका असे मी म्हटलं होतं. आपण निवडणुकीत ताकदीने उतरत असतो. त्यामुळे मी तुम्हाला विश्वास देतो, तुम्ही काळजी करु नका. तुम्हाला काही झालं तर जबाबदार मी असेल. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला. जे झालं ते माझ्या हातात नव्हतं. जे घडलं ते सर्वांसमोर घडलं. त्यांनी माघारीचा निर्णय का घेतला मला माहिती नाही असे देखील सतेज पाटील यांनी सांगितलं.

Whats_app_banner