फलटणमध्ये काळ्या जादूच्या संशयातून महिलेची हत्या! उसाच्या शेतात सापडला धड गायब असलेला मृतदेह
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  फलटणमध्ये काळ्या जादूच्या संशयातून महिलेची हत्या! उसाच्या शेतात सापडला धड गायब असलेला मृतदेह

फलटणमध्ये काळ्या जादूच्या संशयातून महिलेची हत्या! उसाच्या शेतात सापडला धड गायब असलेला मृतदेह

Jan 18, 2025 12:53 PM IST

Phaltan News : फलटण येथे एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. या महीलेचे धड गायब आहे. मृतदेहाशेजारी काळी बाहुली पोलिसांना आढळली आहे. त्यामुळे जादू टोण्यातून महिलेची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

फलटणमध्ये काळ्या जादूच्या संशयातून महिलेची हत्या! उसाच्या शेतात सापडला धड गायब असलेला मृतदेह
फलटणमध्ये काळ्या जादूच्या संशयातून महिलेची हत्या! उसाच्या शेतात सापडला धड गायब असलेला मृतदेह

Phaltan Murder : अमरावती जिल्ह्यात एका वृद्ध महिलेची जादूटोण्याच्या संशयातून धिंड काढून तिला मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर आता फलटणमध्ये देखील एका महिलेचा धड नसलेला मृतदेह सापडला असून त्याच्या शेजारी काळी बाहुली आणि अघोरीविद्येचे साहित्य सापडल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेची हत्या जादूटोण्याच्या संशयातून करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काय आहे घटना ?

फलटण जवळील विडणी येथे शेतकरी प्रदीप जाधव यांच्या शेतात शुक्रवारी एका महिलाचा मृतदेह आढळला. या मृतदेहाचा वरचा भाग गायब होता. तर मृतदेहाशेजारी काळी बाहुली, गुलाला, कुंकू, दिव्याची वात, नारळ आढळल्याने या महिलेची हत्या ही अंधश्रध्दा व काळ्या जादुतून करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणी पोलिसांना माहिती दिली असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. या महिलेची हत्या तीन ते चार दिवसांपूर्वी करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

विडणी २५ फाटा येथे प्रदीप जाधव यांचे उसाचे शेत आहे. शुक्रवारी ते त्यांच्या शेतात गेले होते. यावेळी त्यांना महिलेचा अर्धवट असलेला मृतदेह दिसला. या मृतदेहाच्या शेजारी जादूटोणा व पुजेचे साहित्य व काळी बाहुली त्यांना दिसली. या घटनेची माहिती जाधव यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत घटनास्थळाचा पंचनामा केला. हा मृतदेह जंगली प्राण्यांनी उसातून बाहेर काढला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. मृतदेहा जवळ नारळ, गुलाल, व याच मृत महिलेचे कापलेले केस व तेलाचा दिवा सापडला. त्यामुळे या माहीलेच नरबळी दिला असावा असा देखील अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, या महिलेचा गायब असलेला शरीराचा अर्धवट भाग कोठे आहे ? याचा तपास पोलिस करत आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर