Mahabaleshwar Accident : महाबळेश्वरमध्ये भीषण अपघात; चालकासह टेम्पो ४०० फूट खोल दरीत कोसळला
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mahabaleshwar Accident : महाबळेश्वरमध्ये भीषण अपघात; चालकासह टेम्पो ४०० फूट खोल दरीत कोसळला

Mahabaleshwar Accident : महाबळेश्वरमध्ये भीषण अपघात; चालकासह टेम्पो ४०० फूट खोल दरीत कोसळला

Published Mar 25, 2024 04:22 PM IST

Mahabaleshwar Accident : आंबेनळी घाटात एक टेम्पो तब्बल ४०० फूट खोल दरीत कोसळला. या टेम्पोमध्ये चालकासह काही प्रवासीही असल्याची माहिती मिळत आहे.

आंबेनळी घाटात टेम्पो तब्बल ४०० फूट खोल दरीत कोसळला.
आंबेनळी घाटात टेम्पो तब्बल ४०० फूट खोल दरीत कोसळला.

धुलिवंदनाच्या दिवशीच सातारा जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली असून महाबळेश्वरमध्ये मोठा अपघात झाला आहे. आंबेनळी घाटात एक टेम्पो तब्बल ४०० फूट खोल दरीत कोसळला. या टेम्पोमध्ये चालकासह काही प्रवासीही असल्याची माहिती मिळत आहे. आंबेनळी घाटात मेटतळे या गावाजवळ हा अपघात झाला आहे. महाबळेश्वर ट्रॅकरचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.

अपघातग्रस्त टेम्पो महाबळेश्वरकडून आंबेनळीमार्गे प्रतापगडाकडे निघाला होता. यावेळी घाटातील तीव्र वळणावर टेंपो ४०० फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती समोर आली आहेत. यावेळी घाटातून प्रवास करणाऱ्या अन्य वाहनातील प्रवाशांनी हा अपघात पाहिल्यानंतर याबाबत प्रशासनाला माहिती दिली.

टेम्पो ४०० फूट खाली कोसळला असून चालकासह त्यात काही प्रवासीही असल्याची माहिती मिळत आहे. प्रशासन, स्थानिक नागरिक व महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांकडून मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर