Plane Crashed In Satara : सातारा जिल्ह्यातील कराड विमानतळावर एक मोठा अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. प्रशिक्षणार्थी पायलटचे नियंत्रण सुटल्यामुळे कराड विमानतळाच्या (plane crashed) भिंतीवर विमान धडकले. एका खासगी विमानाचे प्रशिक्षण सुरू असताना ही दुर्घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. गुरूवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ‘सोलो ट्रेनिंग’ सुरु असताना ही दुर्घटना घडली.
कराड विमानतळावर खासगी विमान प्रशिक्षण केंद्र सुरू आहे. विमान विमानतळावर लँडिंग करत असताना प्रशिक्षणार्थी वैमानिकाचे नियंत्रण सुटल्याने विमान भिंतीवर आदळले. या दुर्घटनेत विमानाचे नुकसान झाले असून पायलट सुखरूप आहे. सुदैवाने विमान उतरत असताना ही दुर्घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. घटनेची माहिती मिळताच विमानतळाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा तपास केला जात आहे.
कराडच्या एअरपोर्टवर मुंबईच्या दमानिया एअरवेजच्या अॅम्बिसिअन्स फ्लाईग क्लबने आठ महिन्यांपूर्वी वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. या केंद्रात २० शिकाऊ वैमानिकांची पहिली बॅच प्रशिक्षण घेत आहे. सध्या वैयक्तिक ट्रेनिंग (सोलो ट्रेनिंग) दिले जात आहे. आज नेहमीप्रमाणे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत असताना एका विमानाचा अपघात झाला. धावपट्टीवरुन हे फोर सीटर विमान पॉवर वाढल्याने हवेत उडाले. त्यानंतर काही क्षणातच ते धावपट्टीवरील एका बाजुच्या संरक्षक भिंतीवर धडकले. त्यानंतर प्रशिक्षणार्थींसह अधिकारी व सुरक्षारक्षकांनी धाव घेत प्रशिक्षणार्थी वैमानिकाला विमानातून बाहेर काढले.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अपघातापूर्वी विमान हवेत हेलकावे खात होते. त्यानंतर खाली येत विमान भिंतीवर आदळले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारस म्हणून जनतेनं मला पाठिंबा द्यावा, असं आवाहन करत बिग बॉस फेम अभिजित बिचुकले (Abhijit Bhichukale) यांनी साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. येत्या १९ एप्रिलला ते निवडणुकीसाठी अर्ज भरणार आहेत.
भाजपचं तिकीट मिळावं ही उदयनराजे यांची इच्छा होती. ती पूर्ण झाली. मात्र भाजपनं छत्रपती शिवाजी महाराजांचा किती सन्मान केला याचं आत्मपरिक्षण उदयनराजेंनी व लोकांनी करावं, असं बिचुकले म्हणाले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव संसदेला द्यावं व अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. त्यामुळं सर्व जनतेनं माझ्या पाठिशी उभं राहावं, असं आवाहन बिचुकले यांनी केलं आहे.
संबंधित बातम्या