अनेक कारणामुळे चर्चेत असलेलं पुण्यातील ससून रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.ससून रुग्णालयातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोरआल्याने खळबळ माजली आहे. ससून हॉस्पिटलचे (Sassoon Hospital) डॉक्टर बेवारस रुग्णांना रात्रीच्या वेळेस निर्जनस्थळी सोडून देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड यांनी स्टिंग ऑपरेशन करून याचा व्हिडिओ समोर आणला आहे.
रितेश गायकवाड यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली असून दादासाहेब गायकवाड यांच्या मदतीने त्या रुग्णाना उपचारासाठी पुन्हा ससून रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर ससून रुग्णालयानेही डॉक्टर आदी कुमार यांना सेवेतून निलंबित केलं आहे.डॉ. आदी कुमार (ज्युनियर रेसिडेंट, ऑर्थो विभाग)असे या निर्दयी डॉक्टराचे नाव आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बेवारस रुग्णांना निर्जनस्थळी फेकून देणाऱ्या या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून ससूनचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी डॉ. आदी आणि त्यांच्या सहकाऱ्याला निलंबित केले आहे.कसब्याचेआमदार धंगेकर यांनीआज सकाळी पवार यांची भेट घेऊन संबंधित डॉक्टरांना निलंबन करण्याची मागणी केली. संबंधित डॉक्टरवर कारवाई न केल्यास उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
ससूनमध्ये याआधीही रुग्णांच्या जीवाशी खेळझाल्याचे, आरोपींना आश्रय देण्याचे तसेच रिपोर्ट बदलण्याचे आरोप झाले आहेत. अतिदक्षता विभागात उंदराने रुग्णाचे पाय कुरतडल्याची घटनाही घडली होती. ड्रग्ज प्रकरणातललित पाटीलयांना आश्रय दिल्यानंतरआणि पोर्शे अपघात प्रकरणानंतर ससूनवर कारवाई करण्यात आली होती. त्यातच आता ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली. या प्रकरणाशी संबंधित असणारे डॉक्टर, कर्मचारी, रुग्णांना निर्जन स्थळी नेणारारिक्षावाला यांच्यावर कारवाई होणार का? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले होते.त्यातच आतारुग्णालय प्रशासनाने डॉक्टरांनानिलंबित केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून बेवारस रुग्णांना किरकोळ उपचार करून निर्जन स्थळी सोडलं जात असल्याचा आरोप रुग्ण आधार फाउंडेशनचे दादा गायकवाड यांनी या आधी ही केला आहे. त्यामुळे ससूनमधील या गंभीर प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे,अशी मागणीही त्यांनी केलीआहे.
दादासाहेब गायकवाड बेवारस रुग्णांची सेवा करत असून रस्त्यावर बेवारस पडलेल्या जखमींना ते ससूनमध्ये दाखल करतात. दीड वर्षांपूर्वी अशाच एका बेवारस रुग्णाला त्यांनी ससूनमध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं. मात्र दुसऱ्या दिवशी रुग्णाला पाहण्यासाठी गेल्यावर तो रुग्ण गायब झाल्याचं दिसलं. या संदर्भात चौकशी केल्यावर त्याला डॉक्टर घेऊन गेल्याचं समजलं. यावरून बेवारस रुग्णांसंदर्भात काहीतरी गैरप्रकार ससून रुग्णालयात सुरू असल्याचा संशय त्यांना आला.
हा प्रकार उघडकीस आणण्यासाठी त्यांनी रितेश यांच्यासोबत ससून रुग्णालय बाहेर काही दिवसांपासून पाहणी सुरू केली. सोमवारी पहाटे दीड वाजता रितेश रिक्षा घेऊन ससून रुग्णालयाबाहेर उभे होते. त्यावेळी ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांना रिक्षावाला समजून एका रुग्णाला अशा ठिकाणी सोडून येण्यास सांगितलं जेथून तो परत येणार नाही. तसेच यासाठी नेहमीचा रिक्षावाला ५०० रुपयात हे काम करत असल्याचे सांगण्यात आलं. यामुळे तो रिक्षावाला कोण याची माहिती घेतली जात आहे.
संबंधित बातम्या