मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane: सर्पमित्रानं चक्क घोरपड शिजवून खाल्ली; ठाण्यातील धक्कादायक प्रकार

Thane: सर्पमित्रानं चक्क घोरपड शिजवून खाल्ली; ठाण्यातील धक्कादायक प्रकार

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 03, 2022 12:52 PM IST

Thane Crime News : सर्पमित्र अनेकदा मानवी वस्तीतील सापांना पकडून जंगलात सोडत असतात. परंतु ठाण्यातील एका सर्पमित्रानं केलेल्या कृत्यानं खळबळ उडाली आहे.

Thane Crime News
Thane Crime News (HT)

Thane Crime News : अनेकदा शहरामध्ये साप किंवा इतर सरपटणारे प्राणी आढळले की लोक सर्पमित्राला बोलावतात. ते सापाला पकडून जंगलात सोडत असतात. परंतु प्रत्येक सर्पमित्र हा प्राण्यांचा मित्र असतो, असं नाही. कारण आता ठाण्यातील एका सर्पमित्रानं चक्क एक दुर्मिळ घोरपड शिजवून खाल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं शहरात खळबळ उडाली असून वनविभागानं आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सर्पमित्र विकी गणपत लाड (४१) याचं पाटीलपाड्यातील एका टेकडीवर घर आहे. गुरुवारी संध्याकाळी त्याच्या शेजाऱ्याच्या दुर्मिळ जातीची घोरपड घुसली होती. त्यामुळं खळबळ उडाल्यानं परिसरातील एकानं वनविभागाच्या १९२६ या हेल्पलाइनवर फोन करून याबाबत माहिती दिली होती. परंतु सर्पमित्र असल्याचा दावा करत आरोपी विकी लाडनं घोरपड पकडून नेली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

सर्पमित्र असल्याचा दावा करणाऱ्या विकी लाडनं घोरपड पकडून नेल्याचं वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याच्या घराकडे धाव घेतली. तेव्हा विकीच्या घरातील फ्रीजमध्ये घोरपडीचं शिजवलेलं मांस ठेवण्यात आल्याचं कळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना धक्का बसला. याशिवाय आरोपी विकीनं घोरपडीचं मांस खाल्याचाही संशय वनविभागाला आल्यानं त्यांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, अनेक सर्पमित्र प्राण्यांना वाचविताना कोणत्याही नियमांचं पालन करत नाहीये. याशिवाय जे सर्पमित्र सरपटणाऱ्या प्राण्यांना वाचवत आहेत, त्यांनी त्याबाबतची माहिती वनविभागाला देणं अनिवार्य असल्याचं रोहित मोहिते यांनी सांगितलं आहे.

IPL_Entry_Point

विभाग