Walmik Karad News : संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी वाल्मिक कराड पुण्यात पोलिसांना शरण; त्याआधी काय म्हणाला पाहा!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Walmik Karad News : संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी वाल्मिक कराड पुण्यात पोलिसांना शरण; त्याआधी काय म्हणाला पाहा!

Walmik Karad News : संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी वाल्मिक कराड पुण्यात पोलिसांना शरण; त्याआधी काय म्हणाला पाहा!

Dec 31, 2024 12:49 PM IST

Walmik Karad Surrender in Pune : संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी वाल्मिक कराड हा पुणे सीआयडी पोलिसांसमोर शरण आला आहे.

वाल्मिक कराड पुण्यात CID ला शरण, म्हणाला, संतोष देशमुख प्रकरणात जे आरोप असतील अटक करावी
वाल्मिक कराड पुण्यात CID ला शरण, म्हणाला, संतोष देशमुख प्रकरणात जे आरोप असतील अटक करावी

Santosh Deshmukh Murder Case : बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात व पवन ऊर्जा कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी फरार असलेला वाल्मीक कराडने आज पुण्यात सीआयडी अधिकाऱ्यांपुढे आत्मसमर्पण केलं आहे. देशमुख हत्या प्रकरणात जे आरोपी असतील त्यांना अटक करण्यात यावी असे आत्मसमर्पण करतांना वाल्मीक कराड याने सीआयडीच्या अधिकाऱ्यांना म्हटलं आहे. वाल्मीक कराड हे त्याच्या कार्यकर्त्यांसह दोन गाड्यातून सीआयडीच्या अधिकाऱ्यांपुढे शरण आले. 

काय म्हणाला वाल्मीक कराड ? 

मी वाल्मीक कराड, माझ्यावर केज पोलिस ठाण्यात खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मला अटकपूर्व जामीन मिळवण्याचा अधिकार असतांना देखील पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये आत्मसमर्पण केलं आहे. संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय दोषापोटी माझं नाव या घटनेशी जोडले जात आहे. जर पोलिस तपासात यात मी दोषी आढळलो तर मी शिक्षा भोगायला तयार आहे, असे कराड याने म्हटले आहे.

बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात अलि होती. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. देशमुख यांचे अपहरण आणि हत्येबद्दल तर पवनचक्की फर्मच्या सुरक्षा रक्षकावर हल्ला केल्या प्रकरणी देखील गुन्हा दाखल आहे. तर मस्साजोग येथे पवनचक्की प्रकल्प उभारणाऱ्या अक्षय ऊर्जा कंपनीवर स्थानिक गावकऱ्यांनी २ कोटी रुपयांच्या खंडणी घेतल्या प्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारणी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. देशमुख यांच्या हत्येमागे त्यांचा प्रमुख हात असल्याचा आरोप होत होता. वाल्मीक कराड गेल्या काही दिवसांनपासून फरार होता. सीआयडीच्या पथकाने रविवारी त्याची संपत्ती गोठवली. यानंतर वाल्मीकला अटक कधी होणार हा प्रश्न विरोधक उपस्थित करत होते.

वाल्मिक कराडला २९ डिसेंबरला अटक करण्यात आल्याची माहिती होती. मात्र, सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळून लवले. मात्र, आज १२ च्या सुमारास वाल्मीक कराड पुण्याच्या सीआयडी ऑफिसमध्ये येत शरण आला. त्याला अटक करण्यात आली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर