Santosh Deshmukh Murder : संपूर्ण राज्याला हदारवणाऱ्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी खळबळजनक पुरावे समोर आले आहे. देशमुख यांच्या निर्घृण हत्तेचे फोटो व्हायरल झाले आहे. आरोपींनी यात क्रूरतेचा कळस गाठल्याचे दिसत आहे. ऐवढे सबळ पुरावे असतांना देखील कारवाई होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आज बीड बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले असून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सीआयडीच्या पथकाने आरोपी महेश केदारचा फोन जप्त केला अही. या फोनमधून धक्कादायक व्हिडिओ फोटो समोर आले आहेत. तब्बल १५ व्हिडीओ आणि ८ फोटो जप्त करण्यात आले आहेत. या व्हिडीओत सुदर्शन घुलेसह इतर आरोपी स्पष्ट दिसत आहे. आरोपींनी संतोष देशमुख यांचे हाल हाल करून मारले असल्याचे स्पष्ट झाले आहे. संतोष देशमुख यांचे कपडे काढून त्यांचा जीव जाईपर्यंत मारले आहे. त्यांच्या मारणीचा व्हिडिओ काढला व आरोपीं क्रूरपणे हसतांना दिसत आहेत. संतोष देशमुखांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. तर आरोपींनी त्यांच्या चेहऱ्यावर लघवी देखील केली. काल रात्री उशीरा हे फोटो व्हायरल झाल्यावर राज्यात पुन्हा संतापाची लाट उसळली आहे.
संतोष देशमुख यांना क्रूरपणे मारल्याचे फोटो व्हायरल झाल्यावर बीड जिल्ह्यासह राज्यात नागरिक आक्रमक झाले आहेत. आज बीड बंदची हाक देण्यात आली असून सकाळपासून शहरासह ग्रामीण भागातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. बीड पोलिसांनी नागरिकांना कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले आहे. यासंदर्भात एक पत्रक जारी करण्यात आली असून केलेल्या पत्रकानुसार, मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरणात गुन्हे अन्वेषन विभाग यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. यात तपासाचा भागा असलेले काही फोटो आणि व्हिडीओ माध्यमांवर प्रसारित झाले असून समाजमाध्यमांवर प्रतिक्रीया उमटत आहेत. यासंदर्भात कोणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या