आकाचा आका धनंजय मुंडे, मग ही बडी मुन्नी कोण? सुरेश धस यांच्या टीकेवरून प्रश्न विचारताच भडकले अजित पवार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  आकाचा आका धनंजय मुंडे, मग ही बडी मुन्नी कोण? सुरेश धस यांच्या टीकेवरून प्रश्न विचारताच भडकले अजित पवार

आकाचा आका धनंजय मुंडे, मग ही बडी मुन्नी कोण? सुरेश धस यांच्या टीकेवरून प्रश्न विचारताच भडकले अजित पवार

Jan 10, 2025 09:01 AM IST

Ajit Pawar on Suresh Dhas: भाजप नेते सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यावर अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आकाचा आका धनंजय मुंडे, मग ही बडी मुन्नी कोण? अजित पवारांना विचारला प्रश्न, सगळ्यांसमोर म्हणाले...
आकाचा आका धनंजय मुंडे, मग ही बडी मुन्नी कोण? अजित पवारांना विचारला प्रश्न, सगळ्यांसमोर म्हणाले...

Santosh Deshmukh Murder Case: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. एकीकडे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात असताना भाजप नेते सुरेश धस यांनी अजित पवारांच्या गटात एक बडी मुन्नी आहे, असे वक्तव्य केले. यानंतर ही बडी मुन्नी नेमके आहे तरी कोण? अशी सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. याबाबत अजित पवाराना प्रश्न विचारला असता त्यांनी संताप व्यक्त केला.

अजित पवार म्हणाले की, ‘बडी मुन्नी कोण आहे, हे सुरेश धस यांना जाऊन विचारा. कोणी अशा फालतू गोष्टींवर बोलत असेल तर, मी थेट नाव घेऊन बोलणार आहे. त्यामुळे बडी मुन्नी कोण हे, त्यालाच जाऊन विचारा’, असे ते म्हणाले आहेत. पुढे संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘याप्रकरणाची सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी होत आहे. याप्रकरणातील दोषींना पाठीशी घातले जाणार नाही आणि कोणालाच सोडले जाणार नाही. अजित पवार दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. पक्ष न पाहता दोषींवर कारवाई केली जाईल.या प्रकरणात आम्ही राजकारण आणणार नाहीत’, असेही ते म्हणाले.

सुरेश धस काय म्हणाले?

सुरेश धस म्हणाले होते की, ‘राष्ट्रवादीत बडी मुन्नी आहे. राष्ट्रवादीत एक वरिष्ठ मुन्नी आहे. राष्ट्रवादीत एक बडी मुन्नी आहे आणि त्या मुन्नीला म्हणा तू इथे ये. अमोल मिटकरी, सुरज चव्हाण या लहान पोरांना बोलायला लावते. मला माहिती आहे आणि मुन्नीला माहिती आहे, मी कोणाबद्दल बोलत आहे.’ सुरेश धसांच्या वक्तव्यानंतर विविध चर्चांना उधाण आले.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. या हत्येला एक महिना होऊनही अद्याप सर्व आरोपींना अटक झालेली नाही. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ विरोधी पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनं सुरू केली आहेत. या हत्याप्रकरणामुळे धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात अडकले असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशा मागणीने जोर धरला आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यानेच देशमुख यांच्या हत्येचा कट रचला, असा आरोप केला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेले वाल्मिक कराड यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर