पावशेर दारू पिऊन कोणी धनजय मुंडेना अपमानित केलं तर...; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर हल्लाबोल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पावशेर दारू पिऊन कोणी धनजय मुंडेना अपमानित केलं तर...; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर हल्लाबोल

पावशेर दारू पिऊन कोणी धनजय मुंडेना अपमानित केलं तर...; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर हल्लाबोल

Jan 05, 2025 07:29 PM IST

Gunratan Sadavarte on Manoj Jarange Patil: बीड येथील सर्वपक्षीय मूक मोर्चात जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला त्रास झाला तर, धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू न देणार नाही, असा इशारा दिला. यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गुणरत्न सदावर्तेंचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल!
गुणरत्न सदावर्तेंचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल!

Gunratan Sadavarte News: संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी, यासाठी बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी मूक मोर्चा काढला. या मोर्चात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला पुन्हा त्रास झाल्यास मंत्री धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा थेट इशारा दिला. यावर वकील कील गुणरत्न सदावर्ते यांनी आपली प्रतिक्रिया दिली. पावशेर दारू पिऊन जर कोणी धनजय मुंडे यांना अपमानित करण्याचे धाडस दाखवत असेल तर त्याची गय केली जाणार नाही, असा पलटवार सदावर्ते यांनी केला.

गुणरत्न सदावर्ते यांनी नुकताच पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी जरांगे पाटलांचा एकेरी उल्लेख केला. धनंजय मुंडे यांना रस्त्याने फिरू न देण्याचा इशारा देणाऱ्या जरांगे पटालांना सदावर्ते म्हणाले की, 'पावशेर दारू पिऊन कोणी धनजय मुंडेना अपमानित केले तर, त्याची गय केली जाणार नाही. तुमच्या बापाचे रस्ते आहेत का? शेतीला शेत असल्यास वाट द्यावी लागते. जरांगे तुझे काय शिक्षण आहे? जरांगे असो किंवा धस! मृतांच्या टाळूवरचे लोणी खात आहेत. एखाद्या मृत व्यक्तीच्या नावाखाली राजकारण करत आहेत. पंकजा मुंडे ताई आणि धनंजय मुंडे आज मंत्री आहेत, ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. जरांगे आणि धस सुपारीबाज आहेत. आम्ही धस आणि पावशेरचे चालू देणार नाही', असा इशारा त्यांनी दिला.

राज्यातील ग्रामपंचायतीत ९ जानेवारीला काम बंद आंदोलन

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने ठोस कायदा करावा, या मागणीसाठी राज्यातील ग्रामपंचायतीत ९ जानेवारीला काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे, अशीही माहिती सदावर्ते यांनी दिली.

जरांगे पाटील काय म्हणाले?

बीड येथील सर्वपक्षीय नेत्यांच्या मोर्चात जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली होती. ते म्हणाले होते की, 'संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख न्यायासाठी लढत आहेत. वणवण फिरत आहेत. परंतु, धनंजय देशमुख यांना पोलीस ठाण्यात धमकविण्यात आले, अशी माहिती आम्हाला मिळाली. पण यापुढे संतोष देशमुख यांचे कुंटुब आणि त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्या केसाला धक्का लागला तरी धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. आमचा भाऊ गेला, ते आम्ही सहन केले. पण यापुढे त्यांना डबल त्रास झाला तर, एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही,' असा इशारा जरांगे यांनी दिला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर