Anjali Damania : परळीत वर्षभरात १०९ मृतदेह सापडले; अंजली दमानिया यांचा दावा, धनंजय मुंडे यांचं नाव घेत म्हणाल्या...
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Anjali Damania : परळीत वर्षभरात १०९ मृतदेह सापडले; अंजली दमानिया यांचा दावा, धनंजय मुंडे यांचं नाव घेत म्हणाल्या...

Anjali Damania : परळीत वर्षभरात १०९ मृतदेह सापडले; अंजली दमानिया यांचा दावा, धनंजय मुंडे यांचं नाव घेत म्हणाल्या...

Jan 09, 2025 07:08 PM IST

Anjali Damania on Dhananjay Munde: समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

परळीत वर्षभरात १०९ मृतदेह सापडले- अंजली दमानिया
परळीत वर्षभरात १०९ मृतदेह सापडले- अंजली दमानिया

Anjali Damania News: बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचा तपास फार वेगाने सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गेल्या वर्षभरात एकट्या परळीत १०९ मृतदेह आढळून आले, असा धक्कादाक दावा केला आहे. एवढेच नव्हेतर फक्त तीन प्रकरणात व्यवस्थित चौकशी होताना होत असून इतर १०६ प्रकरणांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच येथील आमदारांचा पोलिसांचा दबाव असून मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाला आज एक महिना पूर्ण झाला. याप्रकरणातील फरार असलेल्या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर, एका आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा एसआयटी आणि सीआयडीच्या माध्यमातून चौकशी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना परळी येथील परिस्थितीवर भाष्य केले.

अंजली दमानिया काय म्हणाल्या?

बीडच्या परळीत मोठ्या प्रमाणात दहशत आहे. एकट्या परळीत वर्षभरात १०९ मृतदेह सापडले, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. त्या म्हणाल्या की, एकट्या परळीत एवढे मृतदेह सापडले असतील तर या जिल्ह्याची स्थिती काय असेल. यातील फक्त तीन प्रकरणात व्यवस्थित चौकशी होताना दिसत आहे. पण बाकीच्या १०६ प्रकरणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. कारण तेथील आमदारांचा आणि वाल्मीक कराडचा पोलिसांवर कंट्रोल आहे. हा कंट्रोल निघाला पाहिजे, यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणे गरजेचे आहे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष बनवण्याचा प्रयत्न

वाल्मीक कराडवर २२ गंभीर आणि इतर २३ कलमे अनेकवेळा लागली आहेत. ज्या व्यक्तीवर ४५ कलमे आहेत, त्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष बनवण्याचा प्रयत्न होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे वाल्मिक कराडला अध्यक्ष करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी शिफारस केली होती. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एकच व्यक्ती असल्याचेसारखे काम करत आहेत. यामुळे संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मीक कराडची पूर्ण चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळाच्या बाहेर गेले पाहिजे, असे अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर