संतोष देशमुख हत्या, वाल्मिक कराडच्या अटकेच्या बातम्या बघतो म्हणून बीडमध्ये कृष्णा आंधळेच्या मित्रांची तरुणाला मारहाण
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  संतोष देशमुख हत्या, वाल्मिक कराडच्या अटकेच्या बातम्या बघतो म्हणून बीडमध्ये कृष्णा आंधळेच्या मित्रांची तरुणाला मारहाण

संतोष देशमुख हत्या, वाल्मिक कराडच्या अटकेच्या बातम्या बघतो म्हणून बीडमध्ये कृष्णा आंधळेच्या मित्रांची तरुणाला मारहाण

Updated Feb 06, 2025 12:12 PM IST

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मीक कराड याच्या अटकेच्या बातम्या का पाहतो असे म्हणत एका युवकाला बीडमध्ये गंभीर मारहाण करण्यात आली आहे

संतोष देशमुख हत्या, वाल्मीक कराडच्या अटकेच्या बातम्या का पाहतो? म्हणत बीडमध्ये कृष्णा आंधळेच्या मित्रांची युवकाला मारहाण
संतोष देशमुख हत्या, वाल्मीक कराडच्या अटकेच्या बातम्या का पाहतो? म्हणत बीडमध्ये कृष्णा आंधळेच्या मित्रांची युवकाला मारहाण

Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात बीड जिल्हा चर्चिला जात आहे. या प्रकरणी वाल्मीक कराडला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या बातम्या का पाहतो असे म्हणत, या खून प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेच्या काही मित्रांनी एका युवकाला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. एवढेच नाही तर तुझा संतोष देशमुख करू अशी धमकी देखील आरोपींनी दिली आहे. हा घटनेत युवक हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला अंबाजोगाईतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

अशोक शंकर मोहिते असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून तो या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. तर वैजनाथ बांगर, अभिषेक सानप असे तरुणाला मारहाण करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी या दोघांवर धारूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी पथकं रवाना केली आहे.

काय आहे घटना?

अशोक शंकर देशमुख हा धारूर गावात त्याच्या मोबाइलवर संतोष देशमुख हत्याकांड व वाल्मीक कराड यांच्या अटकेच्या बातम्या त्याच्या मोबाइलवर पाहत होता. यावेळी या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेचे मित्र वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे दोघे त्याच्यावर आले. यावेळी या दोघांनी संतोष देशमुख आणि वाल्मीक कराडच्या बातम्या का पाहतोस, असा प्रश्न विचारला. तसेच त्याला मरण करण्यास सुरुवात केली. तू येथून पुढे जर मुंडे साहेबांच्या आणि वाल्मीक अण्णाच्या बातम्या व व्हिडिओ पाहिले तर तुझा पण संतोष देशमुख करू अशी धमकी त्यांनी अशोक मोहितेला दिली. दोघांच्या मारहाणीत अशोक मोहिते हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला आंबेजोगाई दवाखान्यात भरती करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपी वैजनाथ बांगर व अभिषेक सानप हे फरार आहेत. त्यांच्या अटकेसाठी धारूर पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले असून दोघांवरही धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी धारूर पोलिसांना सूचना केल्या आहेत.

कृष्णा आंधळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्दयपणे हत्या करण्यात आली होती. यात कृष्णा आंधळे हा मुख्य आरोपींपैकी एक असून तो सध्या फरार आहे. वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे दोघेही कृष्णा आंधळेचे मित्र आहेत. कृष्णा आंधळेच्या मागावर पोलिस असून अद्याप तो सापडला नाही. या प्रकरणी विष्णू चाटे, सुदर्शन घुले अन् इतरांना अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराड यांना अवादा कंपनी ला खंडणी मागितल्या प्रकरणी त्यांना देखील अटक करण्यात आली आहे.

Ninad Vijayrao Deshmukh

TwittereMail

निनाद देशमुख हिंदुस्तान टाइम्स-मराठीमध्ये सीनिअर कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून २०२२ पासून कार्यरत आहे. निनादने पुणे विद्यापीठातून एमए (जर्नलिझम) शिक्षण घेतले आहे. पुण्यातील केसरी वृत्तपत्रातून २००७ मध्ये बातमीदार म्हणून करियरची सुरूवात. २००९ ते २०२२ पर्यंत लोकमत, पुणे येथे वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केले. निनादला डिफेन्स, सायन्स, अंतराळ विज्ञान, आंतरराष्ट्रीय राजकारण विषयांची विशेष आवड आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर