Santosh Deshmukh Case: वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द, बीड जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Santosh Deshmukh Case: वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द, बीड जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई

Santosh Deshmukh Case: वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द, बीड जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई

Jan 12, 2025 01:22 PM IST

Valmik Karad Arms License Cancelled: संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई केली असून वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे.

वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द
वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द

Beed News: बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सातही आरोपींसह एका फरार आरोपीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) १९९९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. दरम्यान, संतोष देशमुख हत्याप्रकरणाची चौकशी सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे आदेश दिले. यानंतर आता दोन आठवड्यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी १०० जणांना शस्त्र परवाना रद्द करण्याची नोटीस पाठवली. या कारवाईत वाल्मिक कराड यांचाही शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे.

वाल्मिक कराड याच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येशी संबंधित खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी स्थानिक केज पोलिसांनी या हत्येसाठी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये त्याचे नाव नाही. कराड हा या हत्येचा सूत्रधार असल्याचे मानले जात असल्याने राजकीय पक्षांमध्ये विरोधाचे वादळ उठले आहे. याच पार्श्वभूमीवर बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज १०० जणांना नोटीस पाठवली.तसेत त्यांना ताबडतोब शस्त्र तात्काळ जमा करण्याचे आदेश देण्यात आले. या कारवाईनंतरही एखाद्या व्यक्तीकडे शस्त्र सापडल्यास त्याच्याविरोदात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. सध्या वाल्मिक कराड सीआयडी कोठडीत आहेत. त्याच्यापर्यंत अद्याप नोटीस पोहोचली नाही. मात्र, कोठडीतून बाहेर आल्यानंतर वाल्मिकला नोटीस दिली जाईल. वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली.

गेल्या वर्षी ९ डिसेंबर रोजी पवनचक्की प्रकल्प चालविणाऱ्या ऊर्जा कंपनीकडून खंडणीचा प्रयत्न रोखण्यासाठी देशमुख यांचे अपहरण, छळ आणि हत्या करण्यात आली होती. बीडच्या पोलिस अधीक्षक नवनीत कानवट यांनी सांगितले की, या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींवर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनवणे, महेश केदार, प्रतीक घुले अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे.

भाजपचे आमदार सुरेश धस आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कराड यांना मोक्कामधून वगळण्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले असून वडेट्टीवार यांनी आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास उशीर होत असल्याबद्दल स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. आरोपींवर पहिल्याच दिवशी मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल व्हायला हवा होता.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर