संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे धागेदोरे पोहोचले भिवंडीपर्यंत! नेमकं काय आहे कनेक्शन ?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे धागेदोरे पोहोचले भिवंडीपर्यंत! नेमकं काय आहे कनेक्शन ?

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे धागेदोरे पोहोचले भिवंडीपर्यंत! नेमकं काय आहे कनेक्शन ?

Jan 06, 2025 10:22 AM IST

Santosh Deshmukh Murder Case : बीड हत्या प्रकरणात रोज नवे नवे खुलासे समोर येत आहेत. आरोपींचं आता भिवंडी कनेक्शन समोर आलं आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे धागेदोरे पोहोचले भिवंडीपर्यंत ! नेमकं काय आहे कनेक्शन ?
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे धागेदोरे पोहोचले भिवंडीपर्यंत ! नेमकं काय आहे कनेक्शन ?

Beed Murder Update: बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी रोज अनेक खुलासे होत आहे. पुण्यातून प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली होती. हे आरोपी फरार असतांना भिवंडीत देखील लपण्यासाठी गेले असल्याचं तपासात पुढं आलं आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा त्याच्या दोन्ही साथीदारांसह ११  डिसेंबरला भिवंडीत मित्राकडे आश्रयासाठी गेला होता. मात्र, त्याने थेट नकार दिल्याने तिघांना तेथून पळ काढावा लागला.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या महिन्यात ९ डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी या प्रकरणी वाल्मीक कराड पोलिसांना पुण्यात शरण आला होता तर फरार मुख्य आरोपी सुदर्शन घुलेस व सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. हत्या केल्यावर हे आरोपी फरार झाले होते. ते थेट भिवंडीत गेले होते. त्यांना लपण्यासाठी जागा हवी होती. त्यामुळे सुरवातीला सुदर्शन घुले व‌ त्याचे साथीदार भिवंडीत एका सामाजिक कार्यकर्त्यांच्या एका कार्यालय गेले. मात्र, ते त्या ठिकाणी नव्हते यामुळे त्यांनी बिअर शॉपचे मालक विक्रम डोईफोडे यांचा पत्ता मिळवला. आरोपींनी डोईफोडे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते ८ डिसेंबरलाच राज्याबाहेर फिरण्यास गेले होते. यामुळे त्यांचा संपर्क झाला नाही. यामुळे ते भिवंडीतील स्वरीत बिअर शॉप व हॉटेल दिपाली वाईन आणि डाईन बार एंड रेस्टॉरंट येथे गेले. दरम्यान, येथील कर्मचाऱ्यांनी ही माहिती विक्रम डोईफोडे यांना दिली. यावेळी त्यांनी आरोपींना तेथे थांबण्यास मनाई केली. यावेळी सुदर्शन घुले व त्याचे साथीदार थोड्या वेळात येतो असे सांगून तेथून निघून गेले.

संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती. यानंतर हे सर्व आरोपी फरार होते. देशमुख यांच्या हत्येचे परिमाण संपूर्ण राज्यात उमटले होते. त्यामुळे आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात होती. या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटी मार्फत केला जात आहे.

या प्रकरणी पोलीसांवर देखील कारवाई झाली आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी पोलिसांवर झालेल्या आरोपानंतर चार बदल्या केल्या आहेत. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची बदली बीड येथील नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. तर पोलीस निरीक्षक वैभव पाटील केज पोलीस स्टेशनचे प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. पोलीस निरीक्षक सय्यद मजहर अली अबू तालीब यांची बदली देखील परळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. तर पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांची केज पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर