Shirish Maharaj More Dies : संत तुकाराम यांचे ११ वंशज व प्रसिद्ध व्याख्याते हभप शिरीष महाराज मोरे यांनी टोकच पाऊल उचलत जिवन संपवलं आहे. या घटनेमुळे देहू गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं अशी प्राथमिक माहिती आहे. त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला.
संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आज त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन जिवन संपवलं आहे. प्रसिद्ध कीर्तनकार आणि शिवव्याख्याते म्हणून मोरे यांची ओळख होती. वयाच्या ३० व्या वर्षी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले शिरीष मोरे यांनी मंगळवारी रात्री जेवण केले. यानंतर ते त्यांच्या खोलीत झोपण्यासाठी गेले. त्यांनी नेहमी प्रमाणे सकाळी खोलीचे दार उघडले नाही. यामुळे घरच्यांनी दरवाजा वाजवला. मात्र, यातून काहीही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे घरच्यांनी दार तोडले. यावेळी शिरीष महराज मोरे यांनी गळफास घेतल्याचे आढळले. हभप शिरीष मोरे महाराज यांच्या पार्थिवावर आज दुपारी ४ वाजता वैकुंठ स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज होते. तसेच त्यांचे निगडी येथे इडली उपहारगृह देखील आहे. त्यांच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे.
शिरीष महाराज मोरे यांनी गळफास घेण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली आहे. यात त्यांनी आर्थिक विवंचनेतुन हे टोकाचं पाऊल उचलंत असल्याचं लिहिलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता. तर एप्रिल महिन्यात त्यांचं लग्न देखील होणार होतं. मात्र, त्यांनी जिवन संपवल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना व देहुकरांना मोठा धक्का बसला आहे.
पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, शिरीष महाराज यांनी आज सकाळी ८.३० च्या सुमारास उपरण्याने गळफास घेऊन जीवन संपवलं. शिरीष महाराज मोरे यांनी नवीन घर बांधलं होतं. खालच्या मजल्यावर आई-वडील व वरच्या मजल्यावर ते राहत होते. मंगळवारी रात्री ते वरील खोलीत झोपण्यासाठी गेले. सकाळी साडे आठ वाजल्यानंतरही ते खाली आले नाही यामुळे घरातील लोकांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा वाजवला. मात्र, त्यांनी तो उघडला नाही. त्यामुळे त्यांच्या खोलीचा दरवाजा तोडण्यात आला. मोरे यांनी पंख्याच्या उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी पुढील तपास देहूरोड पोलीस करत आहे.
संबंधित बातम्या