Sanjay Raut: हरयाणातील काँग्रेसच्या पराभवाच्या जखमेवर संजय राऊत यांनी मीठ चोळले! म्हणाले...
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut: हरयाणातील काँग्रेसच्या पराभवाच्या जखमेवर संजय राऊत यांनी मीठ चोळले! म्हणाले...

Sanjay Raut: हरयाणातील काँग्रेसच्या पराभवाच्या जखमेवर संजय राऊत यांनी मीठ चोळले! म्हणाले...

Published Oct 09, 2024 10:32 AM IST

Sanjay Raut on Congress : हरयाणातील काँग्रेसच्या परभवावर खासदार संजय राऊत यांनी मीठ चोळले आहे. त्यांनी सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला कानपिचक्या दिल्या आहेत.

हरयाणातील काँग्रेसच्या परभवाच्या जखमेवर संजय राऊतांनी मीठ चोळले! म्हणाले...
हरयाणातील काँग्रेसच्या परभवाच्या जखमेवर संजय राऊतांनी मीठ चोळले! म्हणाले...

Sanjay Raut on Congress : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर काँग्रेसचा विश्वास दुणावला होता. हरयाणा विधानसभा निवडणुकीत अनुकून वातावरण असताना काँग्रेसला दारुण प्रभाभव स्वीकारावा लागला. त्यामुळे भाजपने काँग्रेसवर टीका केली आहे. तसेच राज्यात देखील जागा वाटप आणि मुख्यमंत्री पदारून आता काँग्रेसने नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, भाजप प्रमाणे उद्धव ठाकरे गटाने देखील काँग्रेसच्या परभवाच्या जखमेवर मीठ चोळले आहे. संजय राऊत यांनी काँग्रेसवर त्यांच्या खास शैलीत कानपिचक्या दिल्या आहेत. जिंकलेल्या डावाचे पराभवात रुपांतर कसं करायचं हे काँग्रेसकडून शिकायला हवे, अशी खोचक टीका त्यांनी 'सामना'तून केली आहे.

संजय राऊत यांनी सामनातून काय टीका केली ?

आजच्या सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. हरयाणा व जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकांचे निकाल भाजप-काँग्रेससाठी धक्कादायक असून हरयाणात फाजील आत्मविश्वास व स्थानिक नेत्यांच्या भूमिकेमुळे काँग्रेसचा पराभव झाला आहे. हरयाणात भाजप सत्तेत येईल हे कुणीच ठामपणे सांगत नव्हते. काँग्रेसचा या निवडणुकट एकतर्फी विजय मिळवेल असे चित्र असतांना जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर कसे करायचे हे काँग्रेसकडूनच शिकावे लागणार आहे.

हरयाणात भाजपविरोधी वातावरण होते. त्यांच्या मंत्र्यांना कुणी गावात देखील प्रवेश देत नव्हते. असे असतांना काँग्रेसविरोधात वातावरण गेले. हरयाणात अनुकूल परिस्थितीचा फायदा काँग्रेसला घेता आला नाही. त्यांच्या पक्षातील अंतर्गत वादाचा भाजपला फायदा झाला. मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुड्डा यांनी कुमारी सेलजा यांच्यासारख्या नेत्यांचा केलेला अपमान जनतेने पाहिला. दरम्यान, शेतकऱ्यांचे दिल्लीतील आंदोलन, महिला कुस्तीपटूंच्या विनयभंगाचे भाजपने चिरडलेले आंदोलन याची चीड हरयाणातील जनतेत असतांना या सर्वदूर निर्माण झालेल्या नाराजीचा फायदा काँग्रेसला घेता आला नाही.

भाजपविरोधी लाट असतांना भाजपचा परभव झाला नाही. याचे कारण काँग्रेसचे चुकीचे संघटन. सकाळी १०.३० पर्यंत काँग्रेस ६५ जागांवर आघाडीवर असतांना काँग्रेसने विजय साजरा करण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर निवडणूक आयोगाने मतमोजणीचा वेग कमी केला. हे नेमके का घडले ? त्यामुळे हरयाणातील भाजपचा विजय म्हणूनच संशयास्पद आहे असे देखील राऊत यांनी अग्रलेखात म्हटलं आहे.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर