मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut : संजय राऊतांचे निवडणूक आयोगाला फटकारे; म्हणाले, उद्या संध्याकाळनंतर..

Sanjay Raut : संजय राऊतांचे निवडणूक आयोगाला फटकारे; म्हणाले, उद्या संध्याकाळनंतर..

Jun 03, 2024 09:00 PM IST

Sanjay Raut On Election Commission : संजय राऊत म्हणाले की,आम्ही निवडणूक आयोगाला१७पत्रं पाठवून देखील त्याची साधी पोचपावतीही न देणारा निवडणूक आयोग सध्या भाजपची शाखा झाला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेसंदर्भात निवडणूक आयोग काही कारवाई करणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करतो.

संजय राऊतांची निवडणूक आयोगावर टीका
संजय राऊतांची निवडणूक आयोगावर टीका

उद्धव ठाकरेंविरोधात (Uddhav Thackeray)  कारवाईचे आदेश निवडणूक आयोगाने (election commission) दिल्यानंतर संजय राऊत यांनी आयोगावर चांगलेच फटकारे ओढले आहेत. संजय राऊत म्हणाले की, आम्ही निवडणूक आयोगाला १७ पत्रं पाठवून देखील त्याची साधी पोचपावतीही न देणारा निवडणूक आयोग सध्या भाजपची शाखा झाला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेसंदर्भात निवडणूक आयोग काही कारवाई करणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करतो. उद्या संध्याकाळनंतर त्यांना याचा जाब द्यावा लागेल,  असंही ते यावेळी म्हणाले. 

ट्रेंडिंग न्यूज

संजय राऊत म्हणाले की, आयोग हे भाजपचीच शाखा झाली आहे. २० मे राजी मुंबईत मतदान सुरू असताना उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी मुंबईतील संथ मतदानाबद्दल त्यांनी आयोगावर ताशेरे ओढले होते. त्यावरून भाजपकडून निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. 

यावर निवडणूक आयोगाकडून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. ठाकरेंवर कारवाई करावी, असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य आयोगाला दिले आहे. संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या पक्षाने आयोगाला १७ पत्र पाठवले आहेत. तक्रारी आहेत, सूचना आहेत मात्र निवडणूक आयोगाने त्यांची दखल घेतली नाही असं संजय राऊत म्हणाले.

भाजप व मोदींकडून केलेल्या घोषणांवर कारवाई केली जात नाही. मात्र पत्रकार परिषद घेतल्याने कारवाई केली जात असल्याचा आरोप राऊत यांनी यावेळी केला. संजय राऊत यांनी यावेळी अमित शहा यांच्या प्रचार सभा आणि मोदींच्या ध्यान धारणांवरही टीका केली. 

संजय राऊत म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपला मतदान करा तुम्हाला राम दर्शन मोफत घडवू अशी घोषणा अमित शहा देतात. त्याप्रकरणी आम्ही निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे. मात्र त्यावर कोणतीच कारवाई करण्यात आलीय. तर मतदान चालू असताना पंतप्रधान मोदी वाराणसीतून केदारनाथ जातात, तेथे धान्यधारणा करतात. तेथे कॅमेरे लावले जातात, त्यावर आयोग काहीच आक्षेप घेत नसल्याची टीका राऊत यांनी केली आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४