माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यामुळे महायुतीचा विजय! विधानसभा निकालानंतर राऊतांचा मोठा आरोप
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यामुळे महायुतीचा विजय! विधानसभा निकालानंतर राऊतांचा मोठा आरोप

माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यामुळे महायुतीचा विजय! विधानसभा निकालानंतर राऊतांचा मोठा आरोप

Nov 24, 2024 12:18 PM IST

Sanjay Raut on cji chandrachud : राज्यात महाविकास आघाडीच्या पराभवासाठी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड जबाबदार असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यामुळे महायुतीचा विजय! विधानसभा निकालानंतर राऊतांचा मोठा आरोप
माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यामुळे महायुतीचा विजय! विधानसभा निकालानंतर राऊतांचा मोठा आरोप

Sanjay Raut on cji chandrachud : राज्यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे पानिपत झालं आहे. या निवडणुकीत एकट्या भाजपाने १३२ जागा तर महायुतीने २३४ जिंकल्या. तर महाविकास घडीला ५० जागा मिळवतांना देखील कष्ट करावं लागलं. या निकालावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणुकीच्या निकालात गोंधळ झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आज त्यांनी महाविकास आघाडीच्या परभवाचे खापर हे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर फोडलं आहे. राऊत यांनी चंद्रचूड यांच्यावर गंभीर टीका केली आहे.

काय म्हणाले संजय राऊत ?

संजय राऊत म्हणले, महायुती आणि महाविकास आघाडीची लढाई बरोबरीत होती. मात्र, काही तासांत चित्र बदललं. निकाल आधीच ठरला होता. फक्त मतदान करून घेण्यात आलं. या सर्वाला देशाचे माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड जबाबदार आहेत. सरन्यायाधीश असताना त्यांनी जर लवकरात लवकर आमदार अपात्रता प्रकरणात निकाल दिला असता तर हे झालं नसतं. तुम्हाला जर न्याय द्यायचा नव्हता तर त्या खुर्च्यांवर का बसला होता? असा सवाल संजय राऊत यांनी चंद्रचूड यांना केला.

राऊत पुढे म्हणाले, धनंजय चंद्रचूड हे चांगले प्रोफेसर आहेत. ते केवळ भाषणं द्यायला चांगले आहेत. पण, सरन्यायाधीश असतांना त्यांनी घटनात्मक पद्धतीने निर्णय दिला नाही. यामुळे इतिहास त्यांना माफ करणार नाही. त्यांनी योग्य निर्णय दिला असता तर राज्यातील चित्र आज वेगळं असतं. त्यांनी निर्णय न दिल्याने पक्षांतराच्या खिडक्या ते उघड्या ठेवून गेले आहेत. त्यामुळे भविष्यात आता कुणीही कशाही उड्या मारू शकणार आहेत. आता दहाव्या सूचीची भीती कुणालाही उरली नाही. त्यांचं नाव इतिहासात काळ्या अक्षराने लिहिले जाईल असे देखील राऊत म्हणाले.

राज्याच्या मुख्यमंत्री गुजरात लॉबी ठरवेल

महायुतीच्या मुख्यमंत्रीपदावरूनही संजय राऊत यांनी मोठी टीका केली आहे. राज्याचा मुख्यमंत्री गुजरात लॉबी ठवणार असल्याची टीका राऊत यांनी केली. राऊत म्हणाले, राज्यात शपथ घेण्यापेक्षा त्यांनी गुजरातमध्ये शपथविधी घ्यावा, असे झाल्यास त्यांना आनंद होईल. गुजरातमध्ये मोदींच्या नावाने स्टेडियम देखील आहे. त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या सरकारचा शपथविधी घेणं योग्य ठरेल. शीवतीर्थावर शपथविधी झाला तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होईल. तर वानखेडेवर घेतला तर १०६ हुतात्म्यांचा अपमान होईल, असे राऊत म्हणाले.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर