मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘शिवसेना उमेदवाराला कोणी मतदान केलं नाही ते आम्हाला माहीत आहे’
Shiv Sena MP Sanjay Raut
Shiv Sena MP Sanjay Raut (HT_PRINT)
11 June 2022, 6:07 ISTHaaris Rahim Shaikh
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
11 June 2022, 6:07 IST
  • काही बाहेरची अपेक्षित मतं आम्हाला पडली नाही. दोन चार मतांची घासाघीस झाली. आमच्या सगळ्याच नेत्यांनी शर्थीने प्रयत्न केले. आम्हाला कुणी मतदान केलं नाही ते माहीत आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

राज्यसभेसाठी सहाव्या जागेची अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांनी बाजी मारली. या अटीतटीच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला. (BJP defeted Shivsena candidate Sanjay Pawar in RajyaSabha Election) हा पराभव म्हणजे सत्ताधारी शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. पहाटे चार वाजता हा निकाल जाहीर होताच शिवसेनेचे नेते संजय राऊत तडक विधानभवनाबाहेर आले आणि त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘भाजपने नक्कीच जागा जिंकली, परंतु त्यांचा विजय झाला असं मी मानत नाही’, असं राऊत यांनी जाहीर केलं.

ट्रेंडिंग न्यूज

शुक्रवारी निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया लांबल्याने संजय राऊत संतप्त झाले होते. ईडीचा डाव फसला आता रडीचा डाव सुरू झाला, असं रात्री साडे सातवाजता ट्विट करत संताप व्यक्त केला होता. परंतु रात्री उशिरा मतमोजणीला सुरूवात झाली आणि पहाटे ४ वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर करण्यात आले.

निकाल जाहीर झाल्यांतर संजय राऊत म्हणाले, ‘पहिल्या पसंतीची सर्वाधिक मतं ही शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना पडली आहेत. तर भाजपचे विजयी उमेदवार धनंजय महाडीक यांना २६ मतं पडली. दुसऱ्या पसंतीमध्ये आम्ही कमी पडलो. काही बाहेरची अपेक्षित मतं आम्हाला पडली नाही. दोन चार मतांची घासाघीस झाली. आमच्या सगळ्याच नेत्यांनी शर्थीने प्रयत्न केले. आम्हाला कुणी मतदान केलं नाही ते माहीत आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव होता

भाजपने मतदारांवर दबाव आणण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला, असा आरोप संजय राऊत यांनी यावेळ केला. शिवसेनेच्या एका आमदाराचे मतदान बाद ठरवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर राऊत यांनी टीका केली. शिवसेनेचं गणित अजिबात बिघडलेलं नाही. विधानपरिषदेच्या निवडणुकीत सर्व जागा आम्ही जिंकू, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.