मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  आज पोटदुखी, जळजळ अशा सर्व विकारांवर उपचार होतील : संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत (हिंदुस्तान टाइम्स)
14 May 2022, 5:56 AM ISTDilip Ramchandra Vaze
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
14 May 2022, 5:56 AM IST
  • शिवसेना नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या आज होणाऱ्या सभेत इतर पक्षातल्या लोकांच्या अनेक तक्रारींवर योग्य इलाज केले जातील असं म्हटलं आहे.

शिवसेनेची आज मुंबईतल्या बीकेसी मैदानावर विराट सभा होणार आहे. या सभेपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक विधान केलंय. आजच्या सभेत पोटदुखी, जळजळ असणाऱ्यांवर योग्य ते उपचार केले जातील असं संजय राऊत म्हणालेत. शिवसेनेनं या सभेला बुस्टर नाही तर मास्टर डोस असं म्हटलं आहे. करोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीनंतर पहिल्यांदा शिवसेनेने ही सभा आयोजित केली आहे. या सभेला राज्यातनं शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थिती लावतील असा जाणकारांचा होरा आहे.

ट्रेंडिंग न्यूज

राज ठाकरेंच्या तीन सभा, त्या सभांमधलं भोंग्याचं राजकारण आणि राज्य सरकारवर राज ठाकरे यांनी केलेली उघड चिखलफेक, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बुस्टर डोस सभा, रवी राणा आणि नवनीत राणा दांपत्याने नुकतीच दिल्लीत केलेली हनुमान चालिसा, मुख्यमंत्री हेच राज्यावरचं संकट आहेत असं म्हणत नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा डिवचण्याचा केलेला प्रयत्न, त्याआधी मुंबईत राणा दांपत्याचा हनुमान चालिसा अंक, किरीट सोमय्या अशा अनेक राजकीय शत्रूंना आज उद्धव ठाकरे आपल्या भाषेत उत्तर देणार आहेत. फडणवीसांनी बुस्टर डोस म्हटल्यावर शिवसेनेनं त्या सभेला उत्तर म्हणून मास्टर डोस अशी केलेली घोषणा, हिंदू जननायक म्हणून शिवसेना नेत्यांनी उद्धव ठाकरेंचं केलेलं संबोधन असे अनेक महत्वाचे पैलू या सभेतनं उलगडताना दिसणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर बोलताना या सर्व लोकांच्या पोटदुखीवर,जळजळीवर आज योग्य ते उपचार केले जातील असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे

काय म्हणाले संजय राऊत?

आजची उद्धव ठाकरेंची सभा ही आतापर्यंत झालेल्या शंभर सभांचा बाप आहे. मुंबईमध्ये करोनाच्या काळानंतर इतक्या मोठ्या सभा झाल्या नाहीत. शिवसेनेची मुंबईतल्या सभांची परंपरा विराट, अतिविराट अशी आहे.दोन वर्षानंतर शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे अशा प्रकारच्या जाहीर सभेला प्रथमच व्यासपीठावर येतील.आजच्या व्यासपीठाइतकं मोठं व्यासपीठ आजवर तयार झालेलं नव्हतं.शिवसेनेचा संपूर्ण कारभार भव्य असतो.आज मैदानात उतरण्याच्या निश्चयानं आणि जिद्दीनं या सभेचं आयोजन केलं गेलं आहे.महाराष्ट्रातलं, देशातलं आलेलं राजकीय वातावरण आणि धुकं, गढूळपणा हे आजच्या सभेनं दूर होईल. महाराष्ट्राचं आकाश निरभ्र होईल आणि या आकाशात भगवा धनुष्य दिसेल. आम्हाला गर्दी आणावी लागत नाही. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळेल अशा प्रकारची ही सभा असणार आहे. हे राज्य, हा पक्ष हा पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानेच आणि बाळासाहेब ठाकरेंच्या प्रेरणेने चाललेला आहे. काही लोक हे राज्य बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक प्रश्न निर्माण करण्याचा, काही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा पोटदुखी, जळजळ असणाऱ्यांवर आजच्या सभेत योग्य उपचार केले जातील.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग