मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut : ओबीसी-मराठा आरक्षणावरून संघर्ष! संजय राऊतांनी केली ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट; म्हणाले ‘कुणाच्याही…’

Sanjay Raut : ओबीसी-मराठा आरक्षणावरून संघर्ष! संजय राऊतांनी केली ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट; म्हणाले ‘कुणाच्याही…’

Jun 22, 2024 12:22 PM IST

Sanjay Raut on obc maratha reservation : राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा वाद पेटला आहे. मराठा अरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील तर ओबीसी आरक्षण कायम राहावे यासाठी लक्ष्मण हाके आणि छगन भुजबळ यांनी सुरू केलेले आंदोलन चांगलेच पेटले आहे. यात खासदार संजय राऊत यांनी यावरून ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट केली.

ओबीसी-मराठा आरक्षणावरून संघर्ष! संजय राऊतांनी केली ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट; म्हणाले ‘कुणाच्याही…’
ओबीसी-मराठा आरक्षणावरून संघर्ष! संजय राऊतांनी केली ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट; म्हणाले ‘कुणाच्याही…’

Sanjay Raut on obc maratha reservation : राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा वाद पेटला आहे. मराठा अरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील तर ओबीसी आरक्षण कायम राहावे यासाठी लक्ष्मण हाके आणि छगन भुजबळ यांनी सुरू केलेले आंदोलन चांगलेच पेटले आहे. मनोज जरांगे हे सगेसोयरे यासह मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम आहेत. तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या मागणीला विरोध करत उपोषण सुरू केले आहे. राज्यात ओबीसी आणि मराठा अरक्षणावरून मोठा वाद पेटला असतांना आता यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आरक्षणाच्या मुद्यावरून पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. या वेळी संजय राऊत म्हणाले, राज्यात आरक्षणावरुण सुरू असलेला वाद हा दुर्दैवी आहे. कुणाच्याही ताटातले कअधून कुणा दुसऱ्याला देऊ नये अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची भूमिका आहे. राज्यातील विविध समाजांचा विचार केला तर प्रत्येक समाजात मागसलेपण दिसून येईल.

ट्रेंडिंग न्यूज

राऊत म्हणाले, मोदी सरकारच्या धोरणामुळे हे सर्व झाले असून सरकार हे मुद्दे सोडवण्यास अपयशी ठरले आहे. त्यामुळेच हे दोन्ही समाज या मागण्यासाठी आंदोलन करत आहेत. हा वाद सोडवण्यासाठी सरकारने सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करणे अपेक्षित आहे. राज्यात आरक्षणावरुण संघर्ष सुरू आहे. तर बिहारमध्ये वाढीव आरक्षण न्यायालयाने रद्द केले आहे.

महाराष्ट्रातील सरकारनं टीकाऊ आरक्षण देण्याची घोषणा केली होती. पण हे आरक्षण कसं टीकेल? यासाठी प्रयत्न करणं गरजेचे आहे. राज्यात आरक्षणावरून सुरू असलेला संघर्ष हा थांबण्याची गरज आहे. त्यामुळे सर्व पक्षीय चर्चा होणे गरजेचे आहे. हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ उपोषणकर्त्यांकडे पाठवून हा प्रश्न सुटणार नाही. उपोषण करणारे राज्य सरकारवर विश्वास ठेवायला तयार नाही, असे देखील राऊत म्हणाले.

WhatsApp channel