मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘या, मला अटक करा, मान कापली तरी…’ ED समन्सनंतर राऊतांचं फडणवीसांना थेट आव्हान

‘या, मला अटक करा, मान कापली तरी…’ ED समन्सनंतर राऊतांचं फडणवीसांना थेट आव्हान

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jun 27, 2022 02:05 PM IST

शिवसेनेतील बंडाळीनंतर राज्यातील राजकीय घडामोडींवर अद्यापपर्यंत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही.

संजय राऊत
संजय राऊत (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Sanjay Raut On Ed Summons: शिवसेनेत (Shivsena) सुरू झालेल्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणाचा पेच सुप्रीम कोर्टापर्यंत गेला आहे. राजकीय उलथापालथ सुरू असताना शिवसेनेचे नेते संजय राऊत (sanjay Raut) यांना ईडीचे समन्स आले आहेत. समन्स आल्यानंतर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी थेट देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे नाव घेतले आहे. ट्वीटरवर ईडीच्या समन्सबाबत ट्वीट करताना संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्याभरापासून राज्यात राजकीय गदारोळ सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी एकही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र या काळात त्यांच्या पडद्यामागून हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.

संजय राऊत यांनी ट्विटरवर म्हटलं की, मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी..हे कारस्थान सुरू आहे असा आरोपही संजय राऊत यांनी केला. तसंच भाजपसह थेट फडणवीसांना इशारा देताना राऊतांनी म्हटलं की, माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही.या..मला अटक करा असं आव्हानही त्यांनी दिलं आहे.

ईडीने संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणी चौकशीसाठी बोलावलं आहे. उद्या मंगळवारी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स ईडीने बजावले आहेत. यावर संजय राऊत यांनी “अद्याप मला ईडीचे समन्स पोहोचले नाहीत,पण ते संध्याकाळपर्यंत पोहोचतील. पण मी वेळ वाढवून मागणार आहे. माझी काही पूर्वनियोजित कामे आहेत.” असंही म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस कुठे आहेत?
राज्यात इतक्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत असल्या तरी देवेंद्र फडणवीस यांनी अजुनही यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान फडणवीस दिल्लीला चार वेळा जाऊन आल्याचंही सांगण्यात येतंय. यात विधानपरिषद निकालानतंर ते गेले होते. तर त्यानंतर राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी गेली होती. यात ते अमित शहा यांच्यासह बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनाही भेटल्याचे म्हटले जाते. देवेंद्र फडणवीस हे पडद्यामागून हाचलाली करत असल्याची चर्चा आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या