Sanjay Raut On Devendra Fadnavis Over Pune Gangrape: मित्रासोबत फिरायला गेल्या पुण्यातील बोपदेव घाटात २१ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात तीन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. या घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रमाणे पुणे सामूहिक बलात्कार प्रकरणातील तिन्ही आरोपींचा फडणवीस आणि त्यांच्या मिंधे सरकारने एन्काऊंटर करावे, असाही टोला त्यांनी लगावला.
बदलापूर येथील नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. यानंतर राज्यात बऱ्याच ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचे 'बदला पुरा', असा आशयाचे बॅनर झळकले. अशातच पुणे येथे गुरुवारी (०३ ऑक्टोबर २०२४) रात्री मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केला. या घटनेवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, 'पुणे सामूहिक बलात्कार प्रकरणातील तिन्ही आरोपींचा फडणवीसांनी एन्काऊंटर करावे. जे बदलापुरात फडणवीस आणि मिंधेनी केले, तेच येथेही करावे. ही बदलापूर पेक्षा भनायक घटना आहे. फडणवीसांनी आपल्या कमरेला लावलेले पिस्तूल काढावे आणि फोटोमधून बाहेर यावे. फटा पोस्टर आणि निकला क्या खलनायक असे चालणार नाही. सरकारने आरोपींचा एन्काऊंटर करावे.'
पीडित तरुणी काल आपल्या मित्रासह पुण्यातील बोपदेव घाट परिसरात फिरायला गेली असता तीन जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही घटना गुरुवारी (०३ ऑक्टोबर २०२४) रात्री अकरा वाजताच्या सुमारास घडली. त्यानंतर शुक्रवारी (०४ ऑक्टोबर २०२४) पहाटे पाच वाजताच्या सुमारास घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपींनी मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे कारण देत आधी तरुणीचे अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला, अशी माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे बोपदेव घाट परिसरात फिरायला जाणाऱ्या लोकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले.
पालघर जिल्ह्यातील नालासोपाऱ्यात नोकरीचे आमिष दाखवून एका ३० वर्षीय महिलेला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना गेल्या महिन्यात घडली. याप्रकरणी नालासोपाऱ्यातील आचोळे पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
संबंधित बातम्या