मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut: संजय राऊतांचा तुरुंगातला मुक्काम वाढला, न्यायालायाने ईडीला सुनावले

Sanjay Raut: संजय राऊतांचा तुरुंगातला मुक्काम वाढला, न्यायालायाने ईडीला सुनावले

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Sep 19, 2022 03:53 PM IST

Sanjay Raut: मुंबईतील १ हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात गैरव्यवहार प्रकरणी ईडीने संजय राऊथ यांना पीएमएलए कायद्यांतर्गत अटक केली होती.

शिवसेना खासदार संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Sanjay Raut: गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीने अटक केल्यानंतर अद्याप शिवसेना खासदार संजय राऊत यांना दिलासा मिळालेला नाही. संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा १४ दिवसांची वाढ झाली आहे. यामुळे आता ४ ऑक्टोबरपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत रहावं लागेल. दरम्यान, ईडीने आरोपपत्र दाखल केलं असलं तरी न्यायालयाने ईडीला सुनावले आहे.

संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी ४ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. तर ईडीनेही आरोपपत्र दाखल केले आहे. पण या आरोपपत्राची कॉपी मिळेपर्यंत खटल्याची सुनावणी दैनंदिनरित्या चालू शकत नाही असं न्यायालयाने म्हटलं. तसंच ईडीकडून आरोपींना आरोपपत्र देण्यास टाळाटाळ होत असल्याचं निदर्शनास आल्याने न्यायालयाकडून याप्रकरणी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबईतील १ हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात गैरव्यवहार प्रकरणी ईडीने संजय राऊथ यांना पीएमएलए कायद्यांतर्गत अटक केली होती. संजय राऊत यांच्या वकिलांकडून विशेष न्यायालयात जामीन मिळावा यासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र ईडीकडून संजय राऊत यांच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध करण्यात आला. तसंच पत्राचाळ प्रकरणाची चौकशी होईपर्यंत जामीन देऊ नये असंही ईडीने न्यायालयात सांगितलं.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना ३१ जुलै रोजी अटक करण्यात आली होती तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. सुरुवातीला त्यांना ईडी कोठडी सुनावली होती त्यानंतर संजय राऊत न्यायलयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांच्यावर द्वेषातून किंवा राजकीय सूचबुद्धीने कारवाई केली नसल्याचं ईडीने म्हटलं आहे. तसंच संजय राऊत यांनी ईडीवर केलेले आरोप ईडीने फेटालून लावले आहेत.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या