Sanjay Raut : यावेळी रावणाचं अखेरचं दहन; 'डुप्लिकेट मेळावा' म्हणत संजय राऊतांकडून शिंदेसेनेची खिल्ली
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut : यावेळी रावणाचं अखेरचं दहन; 'डुप्लिकेट मेळावा' म्हणत संजय राऊतांकडून शिंदेसेनेची खिल्ली

Sanjay Raut : यावेळी रावणाचं अखेरचं दहन; 'डुप्लिकेट मेळावा' म्हणत संजय राऊतांकडून शिंदेसेनेची खिल्ली

Published Oct 12, 2024 03:21 PM IST

Sanjay Raut On Eknath Shinde : रावणाचे दहन यावेळी अखेरचं दहन असेल. त्यानंतर या महाराष्ट्रात नवीन रावण निर्माण होऊ नयेत, याची काळजी आम्ही घेऊ, असे संजय राऊतांनी म्हटलं.

संजय राऊत व एकनाथ शिंदे
संजय राऊत व एकनाथ शिंदे

महाराष्ट्रात आज दिवसभर दसरा मेळाव्यांची धूम सुरू आहे. आज पहिल्यांदाच मराठा नेते मनोज जरांगे यांनी दसरा मेळावा घेत लाखोंची गर्दी जमवून आपली शक्ती दाखवून दिली आहे.मुंबईत आजसायंकाळीशिवसेनेचे दोन वेगवेगळे मेळावे पार पडत आहेत. ठाकरे गटाचादसरा मेळावा शिवतीर्थावर तरशिंदे गटाचादसरा मेळावाआझाद मैदानावर सायंकाळी ५ वाजता होणार आहे. उद्धव ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता असतानाचठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीशिंदे गटाच्या मेळाव्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना कुणाची हे निवडणूक आयोग ठरवू शकत नाही, खरा दसरा मेळावा एकच जो शिवतीर्थावर होतो, असं संजय राऊत म्हणाले.

सत्तेत बसलेले रावण मुंबई लुटण्याचे काम करत आहेत. त्यामुळे रावणाचे दहन यावेळी अखेरचं दहन असेल. त्यानंतर या महाराष्ट्रात नवीन रावण निर्माण होऊ नयेत, याची काळजी आम्ही घेऊ, असे संजय राऊतांनी म्हटलं.

संजय राऊत म्हणाले की, माझ्या माहिती प्रमाणे देशात दोन मेळावे होतात, एक नागपूरात आरएसएसचा आणि मुंबईत शिवसेनेचा दसरा मेळावा. तो परंपरेनुसार आज होईल. गेल्या ५० वर्षापेक्षा अधिक काळ एकच दसरा मेळावा होतो, जिथे विचारांचं सानं लुटलं जातं. तो म्हणजे शितीर्थावरील शिवसेनेचा दसरा मेळावा. आता मेळाव्याची लाट आली आहे, प्रत्येकाला विचार मांडण्याचा अधिकार आहे. बाकी आता डुप्लिकेट लोक खूप येतात अन् मेळावे करतात, असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

तुम्ही पक्षाचं चिन्ह चोरलं, नाव चोरलं असेल तरीही विचार आणि जनता ही मूळ शिवसेनेच्या बरोबर आहे. शिवसेना कुणाची हे निवडणूक आयोग ठरवू शकत नाही. जो निवडणूक आयोग मोदी शाहांच्या मेहरबानीवर चालतो त्यांना अधिकार नाही. मुंबईतला दसरा मेळावा विधानसभेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे," असं संजय राऊत म्हणाले.

दसऱ्यादिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपुरात एक मेळावा होतो आणि मुंबईमध्ये हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेचा दसरा मेळावा होता. तो परंपरेनुसार आज होईल. शिवसेनेचा मेळावा शिवतीर्थावरच होतो. बाकी आता डुप्लिकेट लोक खूप येतात, मेळावे करतात. ज्या शिवसेनची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली. बाळासाहेब ठाकरे विचारांचे सोने दसऱ्याला महाराष्ट्राला देत राहिले. ती परंपरा उद्धव ठाकरेंनी कायम ठेवली आहे.

दसरा मेळाव्यातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुकलं जाईल. पिपाण्या चालणार नाहीत. आज नक्कीच एक दिशा महाराष्ट्राला लाभेल. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मोठ्या विजयाची मानकरी ठरली. विधानसभाही त्याच पद्धतीने जिंकू, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर