शिवसेना उद्वव ठाकरे गटाचे नेते व रा्ज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप प्रणित एनडीएतील मित्रपक्षांना इशारा दिला आहे. गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच त्यांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करतील, असे राऊत म्हणाले.
जर एनडीएच्या घटक पक्षांना लोकसभा अध्यक्षपद मिळाले नाही तर पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा टीडीपी, जेडीयू आणि एलजेपी (रामविलास) फोडण्याचा प्रयत्न सुरू करतील. आपण हे अनुभवातून बोलत असल्याचे राऊत म्हणाले.
२०१४ आणि २०१९ प्रमाणे हे सरकार स्थिर नसल्याचे राउत म्हणाले. मागील दोन्ही वेळी भाजपचे पूर्ण बहुमतातील सरकार होते. मात्र आता तशी परिस्थिती नाही. सरकार स्थिर नाही, असेही ते म्हणाले.
चंद्राबाबू नायडू यांना विधानसभा अध्यक्ष पद देण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करू, असेही राऊत म्हणाले. परिस्थिती बदलली तर इंडिया आघाडी लोकसभेत आपली ताकद दाखवेल, असेही ते म्हणाले. संपूर्ण इंडिया आघाडी एकत्र येऊन चर्चा करेल आणि नायडूंच्या पाठीशी उभी राहील, असे ते म्हणाले.
गेल्या दहा वर्षांत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी जे काही नुकसान केले त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघही तितकाच जबाबदार आहे, असे सांगून राऊत यांनी मणिपूरमधील परिस्थितीबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या टीकेचे स्वागत केले. भाजपने या देशातील जनतेचे, लोकशाहीचे, काश्मीरचे, मणिपूरचे जे नुकसान केले, त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघही तितकाच जबाबदार आहे. जर त्यांना आपल्या चुका सुधारायच्या असतील तर ही चांगली गोष्ट आहे.
मणिपूर गेल्या वर्षभरापासून शांततेच्या शोधात आहे. त्यावर प्राधान्याने चर्चा व्हायला हवी. गेल्या दहा वर्षांपासून राज्यात शांतता होती. जुनी 'गन कल्चर' संपुष्टात आल्यासारखं वाटलं. तिथे अचानक उठलेल्या किंवा तिथे उठलेल्या तणावाच्या आगीत ते अजूनही जळत आहे. त्याकडे कोण लक्ष देणार? त्याला प्राधान्य देणे आणि त्याची दखल घेणे हे कर्तव्य आहे,' अशा शब्दांत मोहन भागवत यांनी सध्याच्या सरकारवर टीका केली होती.
संबंधित बातम्या