मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut: उद्धव ठाकरेंना राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण, तरीही संजय राऊत का भडकले? वाचा

Sanjay Raut: उद्धव ठाकरेंना राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण, तरीही संजय राऊत का भडकले? वाचा

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 20, 2024 11:53 PM IST

२२ जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच जाहीर केले होते.

Sanjay Raut and  Uddhav Thackeray
Sanjay Raut and Uddhav Thackeray

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शनिवारी (२० जानेवारी) स्पीड पोस्टच्या माध्यमातून राम मंदिर अभिषेक सोहळ्याचे निमंत्रण मिळाले. उद्धव यांना समारंभाला आमंत्रित न केल्याबद्दल उद्धव गटाने भाजपवर टीका केली होती. दरम्यान, उद्धव ठाकरे यांना स्पीड पोस्टद्वारे राम मंदिराचे निमंत्रण मिळाल्यानंतर संजय राऊतांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

'तुम्ही सेलिब्रिटी आणि सिनेकलाकारांना खास आमंत्रण देत आहात. त्यांचा रामजन्मभूमीशी काहीही संबंध नव्हता, पण तुम्ही ठाकरे कुटुंबाला अशी वागणूक देत आहात का? रामजन्मभूमी आंदोलनात ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. प्रभू राम तुम्हाला माफ करणार नाहीत आणि शाप देतील. तुम्ही प्रभू रामाची प्रार्थना करत आहात आणि रावणाप्रमाणे सरकार चालवत आहात,' असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

राम मंदिरात जाण्यासाठी आमंत्रणाची गरज नाही, असे उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी म्हटले होते. त्याऐवजी पंतप्रधान मोदींच्या जागी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अभिषेक सोहळा पार पाडण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. राम मंदिर हे माझे वडील बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. दिर उघडले जाईल हा आनंदाचा क्षण आहे, परंतु भाजपने हा कार्यक्रम कसा काबीज केला, असे उद्धव ठाकरे म्हणाले. २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. त्याचवेळी उद्धव ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिरात पूजा करणार आहेत.

काँग्रेस, माकप, तृणमूल, समाजवादी पक्षाचे नेते या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणार असल्याने मोठा वाद निर्माण झाला. मंदिर उघडल्यानंतर ते आपल्या संपूर्ण कुटुंबासह राम मंदिराला भेट देतील, असे अखिलेश यांनी सांगितले. आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर ते आपल्या कुटुंबियांसमवेत मंदिरात जातील. निमंत्रितांच्या यादीत चित्रपट कलाकार, खेळाडू, पुजारी, न्यायाधीश, उद्योगपती आणि राजकारणी अशा किमान आठ हजार लोकांचा समावेश आहे.

WhatsApp channel