झारखंडमध्ये कॉंग्रेस खासदाराच्या घरात तपास यंत्रणांच्या नोटांची प्रचंड बंडले हाती लागल्याचा मुद्दा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. साहू यांच्या भ्रष्टाचार प्रकरणावर प्रतिक्रिया विचारली असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर केलेल्या आरोपामुळे चांगलंच राजकारण तापलं आहे.
साहू प्रकरणावर प्रतिक्रिया विचारली असता खासदार संजय राऊत म्हणाले, ‘काँग्रेस खासदाराकडे सापडलेल्या संपत्तीवर कायदेशीर कारवाई होईल. पण, केवळ काँग्रेस नेत्यांकडेच ही संपत्ती सापडते का? भाजपच्या नेत्यांकडे ईडी, सीबीआयचे अधिकारी का जात नाहीत? जर इंडिया आघाडीच्या खासदाराकडे २०० कोटी आढळून आले असतील तर भाजपा नेत्यांकडे १ लाख कोटी रुपये काळे धन आढळून येईल.’ अशी प्रतिक्रिया दिली. राऊत पुढे म्हणाले की भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी राज्यात हजारो कोटींचा घोटाळा केला आहे. शिवसेना नेते आणि मंत्री दादा भुसे यांचा १७८ कोटींचा घोटाळा आहे, तर भाजप आमदार राहुल कुल यांनीही घोटाळा केला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. आम्ही ईडीकडे सतत तक्रार केली आहे. त्यांच्यावर कारवाई करा ना. ईडी आणि सीबीआय केवळ भाजप नेत्यांना संरक्षण देण्यासाठी बनवली असल्याचा आरोप राऊत यांनी यावेळी केला.
संजय राऊत यांनी आमदार प्रसाद लाड यांचे नाव घेतल्याने लाड हे संतप्त झाले. संजय राऊत यांच्या आरोपाला उत्तर देताना लाड यांचा तोल सुटला. त्यांनी प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर येऊन राऊत यांना शिवी दिली. शिवाय राऊतच यांनी माफी मागितली नाही तर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं सांगितलं. राऊत यांच्याकडे कोणताही पुरावा नसताना बिनबुडाचे आरोप करत असल्याचं लाड यांनी सांगितलं.
भाजप आणदार प्रसाद लाड यांनी त्यांच्या क्रिस्टल कंपनीच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा थेट आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यांच्यावर तपास यंत्रणांनी धाडी घालाव्या, असं आवाहन राऊत यांनी केलं होतं. ईडी केवळ भाजपविरोधकांवर कारवाई करण्यासाठीच निर्माण करण्यात आली आहे का, असा सवाल राऊत यांनी केला.
संबंधित बातम्या