Sangola Accident : पंढरपूर- कराड महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकने ५ महिलांना चिरडले
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sangola Accident : पंढरपूर- कराड महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकने ५ महिलांना चिरडले

Sangola Accident : पंढरपूर- कराड महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकने ५ महिलांना चिरडले

Updated Jun 18, 2024 06:29 PM IST

Pandharpur Karad road Accident : पंढरपूर -कराड मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत पाच महिला जागीच ठार झाल्या आहेत. शेतातून घरी जात असताना महिलांना ट्रकने उडवले.

पंढरपूर- कराड महामार्गावर भीषण अपघात
पंढरपूर- कराड महामार्गावर भीषण अपघात

Pandharpur Karad road Accident : सांगोल्यामधून एका भीषण अपघाताचे वृत्त समोर आले आहे.पंढरपूर-कराड मार्गावर सांगोला तालुक्यात भरधाव ट्रकने पाच महिलांना चिरडल्याची हृदयद्रावकघटना घडली आहे. शेतातून काम करून घराकडे जातानामहिलांवर काळाने घाला घातला. ट्रकच्या धडकेत पाच महिला जागीच ठार झाल्या.

मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूर -कराड रोडवरील कटफळ गावाजवळ हा भीषण अपघात झाला. अपघातील मृत आणि जखमी महिला सांगोला तालुक्यातील कटफळ गावच्या रहिवासी आहेत. भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिलांना धडक देत फरफटत नेले. यात पाच महिलांचा जागीच मृत्यू झाला तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांना पंढरपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनी ट्रक चालकास पकडून चांगलाच चोप दिला व पोलिसांच्या स्वाधीन केले.

हा अपघात इतका भीषण होता की५ महिलांचा जागीच मृत्यू झाला.महिलांच्या किंकाळ्या ऐकूनस्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात झालेल्या आयशरट्रकमध्ये दोघेजण होते,त्यातील एक जण पळून गेलातरएकाला पकडून लोकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले.

चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं समोर आले आहे. शेतात मजुरी करून या महिला घरी जात असताना हा अपघात झाला. चिकमहूद येथील शेतकऱ्यांच्या शेतावर गेल्या होत्या. काम संपल्यानंतर दुपारी घरी जाण्यासाठी त्या पंढरपूर - कराड रोडवर एसटीची वाट पाहत थांबल्या होत्या. त्याचवेळी पंढरपूरकडून भरधाव जाणाऱ्या ट्रकने त्यांना उडवले. मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने त्याने ८ महिलांना चिरडले. यात ५ जणींचा मृत्यू झाला तर ३ गंभीर जखमी झाल्या आहेत. या भयंकर अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मद्यधुंद कारचालकाने फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना चिरडले,दोघे ठार

पुण्याप्रमाणेच उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये ड्रंक अँड ड्राइवचे प्रकार वाढले आहे. नागपुरात एका कारने वृद्ध व्यक्तीला चिरडल्याची घटना ताजी असतांना रविवारी रात्री एका मद्यधुंद इरटीका कार चालकाने चालकाने फुटपाथवर झोपलेल्या ९ मजुरांना चिरडल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी चौकाजवळ रविवारी रात्री सव्वा बारा हा अपघात झाला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर