Vegetables Prices : चिकनपेक्षा वांगी झाली महाग; श्रावणात भाज्यांचे दर गगनाला भिडले!-sangli vegetables market eggplant price hike price of chicken decreased ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vegetables Prices : चिकनपेक्षा वांगी झाली महाग; श्रावणात भाज्यांचे दर गगनाला भिडले!

Vegetables Prices : चिकनपेक्षा वांगी झाली महाग; श्रावणात भाज्यांचे दर गगनाला भिडले!

Aug 14, 2024 10:46 AM IST

Eggplant price increased Than chicken: सांगली बाजारात भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले असून चिकनपेक्षा वांगी महाग विकली जात आहेत.

श्रावणात भाज्यांचे दर गगनाला भिडले
श्रावणात भाज्यांचे दर गगनाला भिडले

Vegetables Price Hike: श्रावण महिना सुरू झाल्यामुळे हिरव्या भाज्या, फळांसह कडधान्यांच्याही किंमती गगनाला भिडल्या आहेत. गेल्या दोन आठवड्यापासून कांदा, बटाटा, लसूण दरात मोठी वाढ झाली आहे. तर, तुरीचे उत्पादन कमी झाल्याने तूरडाळही २०० रुपयांच्या आसपास पोहोचली आहे. सांगली बाजारात मंगळवारी चिकनपेक्षा वांगी महाग झाल्याचे पाहायला मिळाले.

सांगली बाजारात मंगळवारी चिकनची १३० रुपये प्रतिकिलोने विक्री केली जात होती. तर, सांगलीच्या प्रसिद्ध कृष्णाकाठच्या वांग्याचा दर १६० रुपये किलोवर पोहोचला. श्रावण सुरू झाला की, अनेक घरांतून मांसाहार हद्दपार होतो. यामुळे मांसाहाराच्या विक्रीत घट होऊन त्यांच्या किंमतीतही घसरण होते. सोमवारी चिकनचा दर १४० रुपये इतका होता. अवघ्या २४ तासांत चिकनचा दर १० रुपये किलोने उतरले आहेत. बहुतेक लोक अनंत चतुर्दशीनंतरच मांसाहार खातात. यामुळे मांसाहार विक्रेत्यांना श्रावण संपल्यानंतरही आणखी काही दिवस नुकसानीला सामोरे जावा लागेल. अनंत चतुर्दशीनंतरच चिकनची मागणी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान नाशिक, जुन्नर, पुणे, हिंजवडी येथून मुंबई आणि उपनगरात भाज्यांची आवक होत असते. मात्र या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यानं शेतात पाणी साचले, यामुळे भाज्या खराब झाल्या असून भाज्यांची आवक कमी झाल्याची माहिती विक्रेते देतायत. मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या सोबत किरकोळ बाजारात देखील जवळपास सर्वच भाजीपाल्याने प्रति किलो भावात शंभरी गाठली.

घरगुती बजेट कोलमडले

राज्याच्या काही भागांत मान्सूनलवकर दाखल झाल्याने काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी अत्यल्प पाऊस झाल्याने भाजीपाला पिकाला मोठा फटका बसला आहे. अत्यंत नाशवंत मालाच्या वाहतुकीदरम्यान झालेल्या नुकसानीमुळे घाऊक बाजारात आवक घटली असून, दरात वाढ झाली आहे. मुंबई महानगर प्रदेशाला (एमएमआर) भाजीपाल्याचा पुरवठा करणाऱ्या वाशीतील घाऊक एपीएमसी मार्केटमध्ये गेल्या काही महिन्यात ५० टक्क्यांहून अधिक भाववाढ झाल्याने घरगुती बजेट कोलमडले आहे.

विभाग