मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sangli Crime : द्राक्ष व्यापाऱ्याला एक कोटींना लुटणाऱ्या टोळीचा ८ तासात पर्दाफाश, तिघांना अटक

Sangli Crime : द्राक्ष व्यापाऱ्याला एक कोटींना लुटणाऱ्या टोळीचा ८ तासात पर्दाफाश, तिघांना अटक

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 29, 2023 11:35 PM IST

Sangli robbed one crore : सांगली जिल्ह्यातीलतासगाव येथे नाशिकहून आलेल्या द्राक्ष व्यापाऱ्याला भरस्त्यात गाडी अडवून तब्बल एक कोटी दहा लाख रुपयांची लुट करणाऱ्याटोळीचा सांगली पोलिसांनी केवळ ८ तासात पर्दाफाश केला आहे.

तीन आरोपींना अटक
तीन आरोपींना अटक

सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे नाशिकहून आलेल्या द्राक्ष व्यापाऱ्याला भरस्त्यात गाडी अडवून तब्बल एक कोटी दहा लाख रुपयांची लुट करणाऱ्या टोळीचा सांगली पोलिसांनी केवळ ८ तासात पर्दाफाश केला आहे. टोळीतील तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळ्या आहेत. नितीन खंडू यलमार (वय २२), विकास मारूती पाटील (३२) आणि अजित राजेंद्र पाटील (२२, सर्व रा. मतकुणकी ता. तासगाव) अशीअटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक कोटी नऊ लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.

याप्रकरणी महेश केवलाणी ( नाशिक) यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. महेश केवलानी यांनी तासगाव तालुक्यातील काही द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांकडून द्राक्ष खरेदी केली होती. त्याचे पैसे शेतकऱ्यांना देण्यासाठी ते सांगलीतून तासगावकडून स्कॉर्पिओ गाडीतून जात होते. एक कोटी १० लाख रुपयांची रोकड असलेली बॅग त्यांच्यासोबत होती. तासगावमधील गणेश कॉलनी येथे त्यांची गाडी आली असता ६ ते ७ जणांच्या टोळक्याने त्यांची गाडी अडवली व गाडीचालक, केवलानी तसेच त्यांच्या एका कामगाराला मारहाण करून गाडीतील एक कोटी १० लाख रुपये असलेले बॅग घेऊन पसार झाले. मंगळवारी सायंकाळी सव्वा सात ते साडे सातच्या सुमारास तासगाव येथील गणेश कॉलनी परिसरात हा प्रकार घडला होता.
 

सायंकाळच्यावेळी इतकी मोठी रक्कम लुटण्यात आल्याने पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. एलसीबीच्या पथकाकडून तपास सुरू असताना, ही लुट मतकुणकी येथील नितीन यलमार याने केल्याची व तो साथीदारांसह मणेराजूरी येथील शिकोबा डोंगराजवळ असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तिथे छापा मारून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना हत्यारासह ताब्यात घेतले.

 

यावेळी त्यांच्याजवळ एक कोटी ९ लाख रुपयांची रोकड,३० हजार रुपये किंमतीची दुचाकी आणि तलवार असा माल जप्त करण्यात आला.

IPL_Entry_Point

विभाग