मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  आई-वडिलांसमोरच अल्पवयीन मुलीने शाळेच्या इमारतीवरून उडी घेऊन संपवले जीवन; तिच्या वर्गमित्राचीही आत्महत्या, सांगलीतील घटना

आई-वडिलांसमोरच अल्पवयीन मुलीने शाळेच्या इमारतीवरून उडी घेऊन संपवले जीवन; तिच्या वर्गमित्राचीही आत्महत्या, सांगलीतील घटना

Jan 03, 2024 08:06 PM IST

School Girl Suicide : अकरावीत शिकणाऱ्या एका मुलीने पालकांच्या समोरच शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. त्यानंतर २४ तासाच्या आत त्याच शाळेतील मुलाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे घडली.

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र

सांगली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीने आपल्या आई-वडिलांसमोरच्या शाळेच्या चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारून जीवन संपवले. या घटनेला २४ तास उलटत नाहीत तोच त्याच शाळेत शिकणाऱ्या एका मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. एकाच शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी एका मागून एक केलेल्या आत्महत्यांच्या घटनांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही घटना कुपवाडमधील बामणोली येथे घडली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

साक्षी रविंद्र जाधव (वय १७ रा. मिरज) व प्रथमेश हणंमत पाटील (१७ वर्ष, मूळ रा. कवठेमहांकाळ, सध्या सुभाषनगर, मिरज) अशी आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. कुपवाडमधील एका खासगी शाळेत चौथ्या मजल्यावरून उडी मारून अकरावीत शिकणार्‍या साक्षीने आत्महत्या केली होती. हा प्रकार मंगळवारी सायंकाळी घडला. त्यानंतर त्याच शाळेत व त्याच वर्गात शिकणाऱ्या प्रथमेशने आज (३ डिसेंबर) सकाळी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. दोघांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

मंगळवारी शाळा सुटल्यानंतर साक्षी जाधवने शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. यावेळी तिचे पालकही शाळेतही आले होते. तिला तत्काळ खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. याबाबत कुपवाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, साक्षी शाळा सुटल्यानंतर दफ्तर घेऊन शाळेच्या बसमध्ये बसली होती. दरम्यान तिचे पालक शिक्षकांसोबत बोलत असताना ती बसमधून उठली व शाळेच्या चौथ्या मजल्यावर जाऊन खाली उडी मारली.

या घटनेला २४ तासही उलटत नाहीत तोच त्यात शाळेत शिकणाऱ्या प्रथमेश पाटील या विद्यार्थ्यानेही राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. दोन्ही अल्पवयीन मुलांच्या आत्महत्येमागे समान धागा आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. प्रथमेशने रहात असलेल्या भाड्याच्या घरात गळफास घेतला.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग