Sangli News : आजची पिढी मोबाइलच्या आहारी गेली आहे. मोबाइलच्या अतिवापरामुळे त्यांच्या जीवनावर विपरीत परिमाण होत आहे. यातून मुले टोकाचे पावले देखील उचलत आहेत. अशीच एक घटना सांगलीतील मिरज येथे घडली आहे. ९ वीमध्ये शिकणाऱ्या एका मुलाने वाढदिवसाच्या दिवशी आईने मोबाइल घेऊन दिला नाही म्हणून टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. मुलाच्या या निर्णयामुळे त्याच्या आई व बहिणीला मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिरज येथील मंगळवार पेठ, कुंकुवाले गल्ली परिसर येथे राहणाऱ्या फुटबॉलपटू व ९ वीत शिकत असलेल्या मुलाने आईकडे मोबाइलचा हट्ट धरला होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त आईने वाढदिवसाला नवीन मोबाईल न दिल्याने तो रागावला होता. याच रागातून त्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. आज सकाळी तो दिसत नसल्याने घरच्यानी त्याचा शोध घेतला. यावेळी टेरेसवर त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्याने केलेल्या आत्महत्यमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून या प्रकरणी मिरज शहर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नववीत शिकणारा हा मुलगा चांगला फुटबॉलपटू होता. तो पुढील आठवड्यात एका स्पर्धेसाठी बाहेर गावी देखील जाणार होता. मात्र, मोबाइलच्या हट्टापाई त्याने जीवन संपवले. त्याचा परवा वाढदिवस झाला होता. या वेळी त्याने त्याच्या आईला नाव मोबाईल घेऊन देण्यासाठी आग्रह धरला होता. त्याची आई ही येथील एमआयडीसीत कामाला होती. त्यातून ती कसे बसे घर चालवायची. यामुळे तिने मोबाइल घेऊन देण्यास समर्थता दर्शवली. याचा राग मुलाला आला. तो आईवर नाराज देखील होता. शनिवारी रात्री आई व बहीण झोपी गेल्यावर तो घराच्या टेरेसवर गेला. या ठिकाणी सोलरसाठी उभा केलेल्या लोखंडी अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन त्याचे जीवन संपवलं.
संबंधित बातम्या