मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sangli murder : सांगली हादरले ! सराईत गुन्हेगाराचा दुचाकीवरुण पाठलाग करून धारधार शस्त्राने निर्घृण खून

Sangli murder : सांगली हादरले ! सराईत गुन्हेगाराचा दुचाकीवरुण पाठलाग करून धारधार शस्त्राने निर्घृण खून

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 17, 2023 12:42 PM IST

Sangli murder : सांगली येथे एका सराईत गुंडांचा दुचाकीवरून पाठलाग करत त्याला एकट्याला गाठून त्याच्या निर्घृण खून करण्यात आला.

Sangli murder
Sangli murder

सांगली : सांगली येथे एका सराईत गुंडाचा दुचाकीवरून पाठलाग करून त्याला एकट्याने गाठून धार धार शास्त्रांनी त्याच्यावर वार करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना येथील कुपवाड जवळच्या बामणोली येथे रविवारी रात्री १० च्या सुमारास घडली.

Maharashtra Weather : राज्यात यलो अलर्ट; 'या' जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह कोसळणार, कोकणात धोक्याचा इशारा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमर उर्फ गुट्ट्या जाधव असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. या प्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमर जाधव हा रविवारी रात्री त्याच्या दुचाकीवरून कुपवाड जवळील बामनोली येथे त्याच्या घरी जात होता. यावेळी दुचाकीवरून काही हल्लेखोर त्याचा पाठलाग करत आले. त्यांनी अमर याला रस्त्यात अडवून काही कळायच्या आत धारदार शस्त्रांनी जाधव याच्यावर एकामागून एक वार करत त्याचा निर्घृण खून केला. या हल्यात अमर हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

Karnataka Poll : माजी मुख्यमंत्रीच काँग्रेसमध्ये गेले! भाजप कोणाच्या भरवशावर निवडणूक लढणार?

या घटनेची माहिती मिळताच कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आरोपींच्या शोधासाठी पथक पाठवले आहे. ही घटना पूर्ववैमनस्याटुन्न घडली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. पोलिसांनी घटणस्थळाचा पंचनामा केला आहे.

मृत अमर जाधव सराईत गुन्हेगार

खून झलेला अमर जाधव उर्फ गुट्ट्या हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात कुपवाड पोलीस ठाण्यामध्ये विविध गुन्हे दाखल आहेत. यातूनच त्याची हत्या झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

IPL_Entry_Point

विभाग