मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sangli Accident : लेकीच्या बर्थ-डेचं सेलिब्रेशन करून परतताना अपघात; कार कालव्यात कोसळून एकाच कुटुंबातील ६ ठार

Sangli Accident : लेकीच्या बर्थ-डेचं सेलिब्रेशन करून परतताना अपघात; कार कालव्यात कोसळून एकाच कुटुंबातील ६ ठार

May 29, 2024 10:36 AM IST

Sangli Accident News: सांगलीत एक भीषण दुर्घटना घडली आहे. मुलीच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करून घरी परत येत असतांना कार कालव्यात कोसळल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला.

 सांगलीत मुलीच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करून घरी परत येत असतांना कार कालव्यात कोसळल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला.
सांगलीत मुलीच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करून घरी परत येत असतांना कार कालव्यात कोसळल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला.

Maharashtra Road Accident: सांगलीत एक भीषण दुर्घटना घडली आहे. मुलीच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन आटोपून घरी परत येणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. सांगलीच्या तासगाव - मणेराजुरी मार्गावर कार कालव्यात कोसळून एकाच कुटुंबातील ६ जण ठार झाले आहे. हा अपघात मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास घडला.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Porsche:पुण्यातील दोघांच्या मृत्यूवर निबंध लिहिण्यास सांगणाऱ्या न्यायाधीशांवरही होणार कारवाई? १५ तासात मिळाला जामीन

राजेंद्र जगन्नाथ पाटील (वय ६०), सुजाता राजेंद्र पाटील (वय ५५), प्रियांका अवधूत खराडे (वय ३०), ध्रुवा (वय ३), कार्तिकी (वय १), राजवी (वय २) यांचा मृत्यू झाला आहे. तर स्वप्नाली विकास भोसले (वय ३०) या जखमी झाल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले सर्वजण हे एकाच कुटुंबातील होते. हे तासगाव येथील रहिवासी होते. मुलीच्या वाढदिवसानिमित्त पाटील-भोसले कुटुंबीय हे तासगाववरून वाढदिवसासाठी कवठेमहांकाळ येथील कोकळे गावात गेले होते. तेथून परत येत असतांना हा अपघात झाला.

Maharashtra Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात जिवाची लाही लाही! तापमान कमी होईना;'या' जिल्ह्यांना हीट वेव्हचा अलर्ट

चिंचणी तासगाव - मणेराजुरी मार्गावर चिंचणी हद्दीत रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. कार ही थेट तासारी कॅनॉलमध्ये जाऊन कोसळली. या कालव्यात पाणी नसल्यामुळे कालवा हा कोरडा होता. त्यामुळे वेगात असलेली कार ही कालव्यात आदळली. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान रात्र असल्याने तसेच हा परिसर निर्मनुष्य असल्याने अपघात झाल्यावर तातडीची मदत मिळाली नाही. बुधवारी पहाटे एका व्यक्तीला कालव्यात पडलेली गाडी दिसल्यावर हा अपघात झाल्याचे कळले. यानंतर त्याने याची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानंतर पोलिसांना माहिती देत गावकऱ्यांनी बचावकार्य सुरु केले. दरम्यान, पोलिस देखील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी महिलेला दवाखान्यात भरती केले आहे. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

चालकाला डुलकी लागल्याने अपघात

सर्व जण घरी येत असतांना रात्र झाली होती. दरम्यान, कार चालवत असतांना चालकाच्या डोळ्यांवर झोप असल्याने त्याला डुलकी लागल्याने त्यांची कार ही थेट कालव्यात कोसळली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४