दोन भावांचं भांडण सोडवायला गेला अन् जीव गमावून बसला! इस्लामपूर येथील धक्कादायक घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  दोन भावांचं भांडण सोडवायला गेला अन् जीव गमावून बसला! इस्लामपूर येथील धक्कादायक घटना

दोन भावांचं भांडण सोडवायला गेला अन् जीव गमावून बसला! इस्लामपूर येथील धक्कादायक घटना

Jan 02, 2025 08:43 AM IST

Islampur Murder : सांगली जिल्ह्यातील इस्लामपुर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन भावांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एकाची हत्या करण्यात आली आहे.

दोन भावांच भांडण सोडवायला गेला अन् जीव गमावून बसला! इस्लामपूर येथील धक्कादायक घटना
दोन भावांच भांडण सोडवायला गेला अन् जीव गमावून बसला! इस्लामपूर येथील धक्कादायक घटना

Islampur Murder : कुणाचं भांडण सुरू असल्यास त्यांच्यामध्ये पडू नये असं म्हटलं जातं. मात्र, या कडे दुर्लक्ष करून माणुसकीच्या नात्याने एकाने दोघा भावांमधील भांडण सोडवण्याचा केलेला प्रयत्न हा संबंधित व्यक्तीच्या जीवावर बेतला आहे. ही घटना सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील पेठ येथे घडली आहे. सचिन सुभाष लोंढे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपींने त्याच्या छातीत चाकू भोसकून त्याचा खून केला. या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे घटना ?

संग्राम शिंदे व शरद शिंदे हे दोघे भाऊ आहेत. सचिन लोंढे हा त्यांचा मित्र आहे. या दोघांच्या शेजारीच सचिन लोंढे यांचे घर आहे. तिघेही चांगले मित्र आहेत. शिंदे भावांमध्ये नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद व भांडणे होत होते. मंगळवारी रात्री देखील दोघा भावांमध्ये वाद झाले. यावेळी सचिन हा शरद व संग्राम यांच्यामधील भांडण सोडवण्यासाठी गेला. दरम्यान, वाद निवळल्या नंतर सचिन लोंढे व त्याचे मित्र विश्वजीत शिंदे, शाकिर शिंदे , ऋषिकेश वारे हे भीमनगर परिसरात उभे होते. यावेळी शरद शिंदे व संग्राम यांची बहिण मयुरी हे दोघे त्यांच्या घरी जात होते. त्यावेळी संग्राम शिंदे हा दुचाकीवरून हातामध्ये चाकू घेवून उभा असलेला शरद याच्या सोबत भांडू लागला. दोघेही एकमेकांना शिवीगाळ करत होते. यावेळी त्यांच्यात हाणामारी देखील सुरू झाली. 

दरम्यान, शरद व संग्राम यांच्यातील भांडण सोडवण्यासाठी सचिन गेला. यावेळी संग्रामने , तू आमच्यामध्ये पडू नको असे म्हणत हातातील चाकू सचिन शिंदेच्या छातीत खुपसला. हा घाव वर्मी लागल्याने तो खाली पडला. त्याच्या छातीतून रक्तस्त्राव झाला. यानंतर आरोपी संग्राम ने तेथून पळ काढला. शरद व त्याच्या मित्रांनी जखमी सचिनला इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. इस्लामपूर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करत आरोपी संग्राम ला अटक केली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर