Speeding Car Hits Autorickshaw In Sangli: सांगलीच्या पुणे- बंगळुरू महामार्गावरील येडेनिपाणी फाटा येथे भरधाव कारने रिक्षाला धडक दिली. या धडकेत एक महिला आणि तिच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. या मायलेकी रिक्षाने औषध आणायला जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. याप्रकरणी कारचालकाविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.मात्र, या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
अक्काताई भुजंगा येडके (वय,७०) आणि शारदा लक्ष्मम सुपणे (वय, ५०) अशी अपघातात मरण पावलेल्या मृतांची नावे आहेत. अक्काताई आणि शारदा या इस्लामपूरमधून कोल्हापूर जिल्ह्यातील पोरले या गावात औषध आणण्यासाठी जात होत्या. मात्र, पुणे- बंगळुरू मार्गावरील येडेनिपाणी फाटा येथे त्याच्या रिक्षाला भरधाव कारने पाठीमागून धडक दिली. या धडकेनंतर रिक्षा रस्त्यावरून २० फूट खाली कोसळल्याने अक्काताई आणि त्यांची मुलगी शरदा यांचा जागीच मृत्यू झाला. तर, रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच कुरळप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली. अपघात नेमके कशामुळे झाला? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. या अपघातात रिक्षाचा अशरक्ष: चुराडा झाल्याचे पाहायला मिळाले, त्यावरूनच हा अपघात किती भीषण होता, याचा अंदाज लावला जाऊ शकतो. दरम्यान, माय- लेकींचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळले.
संबंधित बातम्या