माता न वैरिणी.. प्रेमात अडथळा ठरणाऱ्या दोन्ही मुलांना प्रियकराच्या मदतीनं संपवलं; तळ्यात बुडून मेल्याचा रचला बनाव
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  माता न वैरिणी.. प्रेमात अडथळा ठरणाऱ्या दोन्ही मुलांना प्रियकराच्या मदतीनं संपवलं; तळ्यात बुडून मेल्याचा रचला बनाव

माता न वैरिणी.. प्रेमात अडथळा ठरणाऱ्या दोन्ही मुलांना प्रियकराच्या मदतीनं संपवलं; तळ्यात बुडून मेल्याचा रचला बनाव

Jun 20, 2024 11:57 PM IST

Crime News : प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पोटच्या दोन्ही मुलांची महिलेने प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आई व तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

प्रेमात अडथळा ठरणाऱ्या दोन्ही मुलांना प्रियकराच्या मदतीनं संपवलं (सांकेतिक छायाचित्र)
प्रेमात अडथळा ठरणाऱ्या दोन्ही मुलांना प्रियकराच्या मदतीनं संपवलं (सांकेतिक छायाचित्र)

अहमदनगर  जिल्ह्यातील संगमनेरमध्ये दोन महिन्यापूर्वी शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र या प्रकरणाला आता वेगळीच कलाटणी मिळाली आहे. दोन्ही मुलांची हत्या त्यांच्या जन्मदात्री आईनेच केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पोटच्या दोन्ही मुलांची महिलेने प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आई व तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

आई कविता सारंगधर पावसे आणि तिचा प्रियकर सचिन बाबाजी गाडे यांना याप्रकरणी अटक केली आहे. एप्रिल महिन्यात महिन्यांपूर्वी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील शेततळ्यात बुडून दोन भावंडांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना १७ एप्रिल २०२४ रोजी घडली होती. रितेश सारंगधर पावसे (वय १२ वर्ष) आणि प्रणव सारंगधर पावसे (वय ८ वर्ष) अशी मृत भावंडांची नावे होती.

याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र गावकऱ्यांनी या प्रकाराबाबत संशय व्यक्त केला होता. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास करत सत्य समोर आणले आहे. दोन महिन्यानंतर या दोन संख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून नव्हे तर त्यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे मुलांच्या आईनेच त्याचा घात केला आहे. प्रेमात अडथळा ठरत असलेल्या मुलांना जनमदात्या आईने आणि तिच्या प्रियकरानेच शेततळ्यात ढकलल्याचे समोर आले आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मुलांच्या वडिलांचे एका वर्षापूर्वीच निधन झाले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर आईच त्यांचा सांभाळ करत होता. दोन्ही मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली होती.

ग्रामस्थांच्या संशयानंतर दोन महिन्यानंतर एका साक्षीदाराने दिलेल्या जबाबावरून हा अपघात नव्हे तर हत्या असल्याचं समोर आलं. पतीच्या निधनानंतर कविताचे सचिनसोबत सूत जुळले होते. मात्र त्यांच्या प्रेमप्रकरणात मुलांचा अडथळा होत होता. यातून त्यांनी दोघांना संपवण्याचा निर्णय घेतला.

 

एका महिन्यात हसतं-खेळतं कुटूंब संपलं -

नाशिकमध्ये एका महिन्यात कुटूंबातील ४ सदस्यांचा मृत्यू झाल्यास एक हसते खेळते कुटूंब संपले आहे. ९ वर्षीय मुलीचा अजारपणामुळे मृत्यू झाला. याचा आईला मोठा धक्का बसला व तिच्या तेराव्याला तिनेही जीव सोडला. या दोघींच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाप-लेकावरही काळाने घाला घातला. राहत्या घरात बाप-लेकाचा मृतदेह आढळून आल्याने हे चौकोनी कुटूंब संपले आहे. या घटनेने नाशिक शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर