मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jalgaon News : जळगावात वाळू माफियांचा निवासी जिल्हाधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला, रक्तबंबाळ अवस्थेत पोहोचले दवाखान्यात

Jalgaon News : जळगावात वाळू माफियांचा निवासी जिल्हाधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला, रक्तबंबाळ अवस्थेत पोहोचले दवाखान्यात

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 07, 2024 09:56 AM IST

Jalgaon sand mafia crime : जळगाव जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी रात्री वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या निवासी जिल्हयाधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला तसेच शासकीय वाहनांवर दगडफेक देखील करण्यात आली.

Jalgaon sand mafiya crime
Jalgaon sand mafiya crime

Jalgaon Sand mafiya crime : जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांनी कहर केला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी वाळू माफियांवर धाड टाकत मोठी कारवाई केली. दरम्यान, या कारवाई विरोधात वाळू माफीयांनी कासार यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या सोबतच शासकीय वाहनांवर मोठी दगडफेक देखील केली. या घटनेत सोपान कासार हे गंभीर जखमी झाले असून रक्तबंबाळ अवस्थेत ते थेट दवाखान्यात पोहचले. 

ही घटना मंगळवारी रात्री ११.३० च्या सुमारास नशिराबाद येथे घडली. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नाकाबंदी करण्याचे आदेश दिले आहे.

Maharashtra Weather update : राज्यातील तापमानात वाढ! विदर्भ मराठवाड्यात आजही पावसाचा इशारा; असे असेल आजचे हवामान

जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाळू माफियांनी उच्छाद घातला आहे. याला आवर घालण्यासाठी मंगळवारी सोपान कासार हे त्यांच्या पथकासह नशिराबाद येथे रात्री गेले होते. यावेळी त्यानी दोन वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई केली. यावेळी काही वाळू माफियांनी त्यांच्यावर थेट लोखंडी रॉड आणि काठ्यांनी हल्ला केला. यात कासार हे गंभीर जखमी झाले. काहींनी शासकीय वाहनांवर दगडफेक देखील केली. यामुळे गड्यांच्या काचा फुटल्या आहेत. या घटनेचे चित्रीकरण करणाऱ्या अधिकाऱ्याचा मोबाइल देखील गुन्हेगारांनी फोडून टाकला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. जखमी अवस्थेत कासार हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोहचले. त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांच्यासह पोलिस ताफा घटनास्थळी दाखल झाला. आयुष प्रसाद यांनी कासार यांची भेट घेतली असून या प्रकरणी चोख कारवाई करण्याचे तसेच नाकाबंदी करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना दिले आहे.

NCP Sharad Pawar : पक्ष व पक्षचिन्ह गेल्यानंतर शरद पवारांसमोर काय पर्याय? ‘हे’ चिन्ह व नाव मिळण्याची शक्यता

निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, तहसीलदार विजय बनसोडे हे अन्य दोन जणांसह शासकीय वाहनाने कारवाई साठी गेले असता तरसोद फाटा ते नशिराबाद दरम्यान अवैध वाळू वाहतूक करणारे दोन डंपर पथकाने पकडले. यातील दुसरे वाहन न थांबता पुढे गेल्याने त्याचा पाठलाग करून त्याला परत आणण्यात येत होते. यावेळी ठिकाणी तहसीलदार विजय बनसोडे थांबून होते. तर सोपान कासार हे शासकीय वाहनात बसलेले होते. यावेळी सात ते आठ जण त्यांच्या दिशेने येत त्यांच्यावर रॉडने आणि काठ्यांनी हल्ला केला. रॉड कासार यांच्या डोक्यावर लागण्याने त्यांना गंभीर जखम झाली आहे.

धुळ्यातही तहसीलदारांना मारहाण

वाळूची अवैध वाहतूक करताना पकडल्याचा राग आल्याने शिरपूर येथील तलाठ्यास शिवीगाळ करीत धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तलाठी सुरेश तुकाराम ठाकरे यांनी फिर्याद दाखल केली.

WhatsApp channel